Thursday 14 June 2018

बिर्ला मंदिर अलिबाग

बिर्ला मंदिर ,

नमस्कार

Birla Mandir Alibag


अलिबागच्या बिर्ला  गणेश मंदिर ला जायचे असेल तर रेवदंडा खाडी ओलांडली कि एक रास्ता लागतो त्याच एक भाग मुरुड जंजिरा ला जातो तर दुसरा रोहा महाड येथे जातो . रोहा महाड रास्त्यावर हे बिर्ला मंदिर आहे . डोंगरावर आहे . डोंगऱ्याच्या तळाशी तेथे , तुम्हाला गणपतीला वाहण्यासाठी हार फुले दुर्वा नारळ वगरे एका प्लास्टिक च्या टोपलीत विक्रीसाठी घेऊन तेथील ग्रामीण स्त्रिया येतात .

गणेश मंदिरात जाण्यासाठी छान असा प्रवेश द्वार  केला आहे . त्यातील लहान दरवाज्यातून तुम्हाला सुरक्षा रक्षकाच्या तपासणीतून जावे लागते .

Birla Mandir अलिबाग


निसर्ग संपन्न अश्या डोंगरावर हे गणपती मंदिर बिर्ला ह्यांनी संगमलोरी दगडाने बांधले आहेत. मंदिर आतिष य सुंदर आहेत . मंदिरात जयानासाठी अनेक संगम लॉरी पायऱ्या चढाव्या लागतो .

मंदिरायच्या सभोवती सुंदर बाग केली  आहे, तयात विविध फुलांची झाडे आहेत , तसेच नारळाची झाडे आहेत . आत मंदिरात सुंदर गणेश मूर्ती आहे . तेथे "मक्ख चाऱ्याचे दोन पुजारी आहेत . आपण नेले ले हार फुले नारळ इत्यादी वाहतात . एका रोबोटिक पद्धतीने त्यात कुठल्या हि पद्धतीचा भाव वगरे नसतो . नारळाची वाटी आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो .

गणपती  मंदिराच्या भोवती सूर्य मंदिर, शंकर पार्वती , दुर्गा इत्यादी सांगोमलोरी मुर्त्या आहेत . त्यांच्या चेहऱ्याला देवत्त्व आहे पण ते सर्व बंद दरवाज्या आडून पहावयाचे .

त्यामुळे हे " तेहरीस कोटी देव बंदी हरिलें सीते ला " अशा दशावताराच्या आरतीच्या ओली आठवतात .

मग माझ्या लक्षात आले के गणपती बाप्पा मला येथे निर्विकार का वाटलं !

येथे सुंदर मंदिर आहे . आजूबाजूच्या डोंगरावरचा निसर्ग बघायला मिळतो . प टिपून घेयासाठी आपल्या जवळ कॅमेरा किव्हा मोबाइल नसतो . कारण येथे मोबाइल व कॅमेरा ला परवानगी नाही !

त्यामुळे आपण एक प्रकारे नाराजीने डोंगर उतरता. आता म्हणे हे मंदिर JSW नावाच्या एका कंपनी च्या ताब्यात आहेत !



Birla Mandir अलिबाग






ध्यानवाद


No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels