Tuesday, 3 November 2020

इति पुरण पोळी आख्यान.

              " पुरण पोळ्या मिळतील का हो"!एक सुंदर तरुणी,एक छोटे खाणी दुकानदाराला विचारत होती , चेहरयावर साशंकता होती,दुकान मराठी माणसाचे होते, "  आ!. दुकान मालक. आता मालक साशंक,"नाही"! "आम्ही ऑर्डर प्रमाणे देतो,! थोडावेळ थांबून,केस नसलेले डोके खाजवीत ,पुन्हा त्या तरुणी कडे पहात
                "किती हव्यात?"
                  "पाच हव्यात, तुमच्याकडे किती आहेत,?"
            दुकानदार एकदा रस्त्याकडे, एकदा तिच्याकडे मधेच, हातातील घडल्या कडे पहात, म्हणाले"अ..... दहा आहेत"!.
                "आकरा नाहीत का ?"
            "नाहीत, तुम्हाला गणपतीला ठेवायचे का, मग तुम्ही 'सात' दाखवा ते चालेल!".
              "  पण मी ,तुम्हाला प्रथम  देणार नव्हतो, पण मी आता तुम्हालाच देतो,! पुन्हा एकदा घडल्यात,  रस्त्याकडे पहात,तरुणीला म्हणाले,
                  तरुणी घोंढळून हे सर्व पाहत  मान हलवीत "ह ह असे म्हणत , ऐकत होती .
                 " आहो, काय झाले, काल एक गृहस्थ, संध्याकाळी मला दहा पुरण पोळ्यांची ऑर्डर  देऊन गेले, आणि सांगून गेले, उद्या, म्हणजे आज सकाळी 'नऊ'वाजता मी पोळ्या घेऊन जाईन , आता 'बारा वाजले तरीआजून त्यांचा पत्ता नाही की फोन नाही, व मी फोन केला तर ते हुचलात नाही आणि आता आले तरी , मी नाही देणार,असे म्हणत त्यांनी दहा पुराण पोळ्या व्यवस्थित पणे कागदी पिशवीत प्याक करून दिल्या  मात्र त्यांचे बोलणे चालूच होते,"ह्या पोळ्या तुमच्याच नशिबात असणार ,तुमच्या, गणपती साठी,आणि माझे नुकसान होणार होते, मी खरे म्हणजे ऍडव्हान्स घेतो, पण काय झाले, कुणास ठाऊक, मी विसरलोच, मात्र त्याने फोन नंबर दिला तो घेतला म्हणून बरे झाले, निदान मी त्यांना फोन करीत राहिलो म्हणजे मला दोष मिळणार नाही ",हे एक चांगले झाले की नाही?"
"अ, हो बरोबर केलेत तुम्ही किती पैसे द्यायचे मी, " त्यातरुणीने विचारले
     "  द्या दोनशे रुपये "! आम्ही ह्या घरी बानोवतो, त्यासाठी गावातील बायकांना बोलावतो त्याप्रमाणे सकाळी पाच वाजता त्या ल्या आणि सात वाजता पोळ्या तयार  झाल्या , आणि मी  नऊ वाजल्या पासून मी त्यांची वाट पाहतो आहे, बरे झाले तुम्ही आलात, देव पावला!"
         "हो तुम्हाला पण आणि आम्हाला सुद्धा, हे घ्या दोनशे रुपये, थँक्स,
             "अहो मीच तुम्हाला थँक्स म्हणतो, आणि तो आलाच तर मी त्याला सांगूनच टाकेन, पोळ्या सम्पल्या तुमच्या नशीबातच नव्हत्या त्या,!" अस म्हणत पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली, आणि दोनशे रुपये कॅश बॉक्स मध्ये टाकले आता चेहेऱ्यावर विजयाची भावना होती त्या तरुणीला पोळ्या मिळाल्या याचा चमत्कार वाटत होता ,कोण असेल तो मनुष्य , का बरे तो आला नसेल,गणपतीला आज शेवटच्या दिवशी,पुरण पोळी नयवेद्यात असणे,हे आज पर्यंतचे सेवेचे पूर्णत्व असते म्हणून या दोन आवश्यक होते ते गृहस्त न आल्याने ते शक्य झाले, याचे श्रेय त्यांना पणआहे,,त्यांना मिळोच पण, कंटाळा न करता, मी येथे आले ते चांगले झाले, गणपती बाप्पा अशीच सेवा आमच्या कडून घडू दे, अस विचार करीत, ती पुढ्यात अचानक आलेल्या रिक्षात  बसली.चेहेऱ्यावर विलक्षण समाधान घेऊन .

No comments:

Post a Comment

वर्ण, जाती

  At the outset , i must confess that I don't have much , rather least knowledge our of Religion . I have varna ,caste syste...

Labels