Saturday, 16 June 2018

श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब पेशवे भाग 1 (बालपण)

श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब पेशवे  

Chimaji Appa


थोरले बाजीराव ह्यांचे धाकटे व त्यांचे लाडके बंधू म्हणजे चिमाजी अप्पा , बुद्धिमान अनेक विषयांचे अभयासु म्हणून छत्रपती शाहू महाराज ह्यांनी चिमाजी अप्पा ह्यांना "पंडित"  उपाधी दिली होती, वयाच्या बाराव्या वर्षी !

Chimaji Appa  peshwa bajirao


चिमाजी अप्पा साहेब लहानपणी तब्यतीने तसे नाजूक होते संस्कृत चा त्यांना गाढा अभ्यास होता . तसेच वनस्पती शास्त्र , आयुर्वेद , चाणक्यनीती, भगवद गीता  ह्यांचा त्यांना अभ्यास होता . त्यामुळे ते कित्येकदा घरातल्यांचा लहानपणच घरगुती औषधांनी उपचार करायाचे . तसेच त्यांना संगीताची हि खूप आवड होती, व राज दरबारी गायक वाहावे असे हि त्यांना लहानपणी खूप वाटायचे . 


असे म्हणतात कि लहानपणी जेव्हा अप्पासाहेबांना युद्धशास्त्राचा अभ्यास करायला त्यांच्या घरातील मंडळी सांगायची तेव्हा ते कोणाला हि जुमानत  नवहते .  युद्धशास्त्राच्या  अभ्यासला नेहमी टाळा टाळ करायचे . त्यामुळे त्यांना तंजावूर येथे युद्धशास्त्राच्या  अभ्यासला एकटेच पाठवायचे असे त्यांच्या तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ ह्यांनी ठरविले . ह्याला चिमाजी अप्पासाहेबांच्या  आईसाहेब म्हणजे राधाबाई व बंधू बाजीराव बल्लाळ ह्यांनी विरोध केला .
Chimaji Appa  peshwa bajirao  anuja sathe


पण च्या तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ  त्यांना घेऊन निघाले . त्यांच्या सोबत अप्पासाहेब ह्यांचे बंधू बाजीराव बल्लाळ हे हि आले . त्याप्रमाणे कावेरी नदीच्या किनारी त्यांना नौकेत बसवून त्यांचे  तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ व बंधू बाजीराव जड पायाने निघाले . 


काही दिवसांनी त्यांना असे कळले कि नदीला पूर येऊन बरीच जीवितहानी झाली होती . त्यामुळे  राधाबाई साहेब ह्यांना  वाटले कि चिमाजी अप्पासाहेबांचे म्हणजे त्यांच्या लाडक्या चिमणा चे काही बरे वाईट झाले असावे म्हणून त्यांनी त्यांचे पती देव श्री बाळा जी विश्वनाथ ह्यांना खूप दोष दिला . 

परंतु काही दिवसांनी तंजावूर च्या राजाचे पत्र आले व त्यांनी चिमाजी अप्पासाहेब चे कौतुक केले कि चिमाजी तेथे सुखरूप असून त्यांचे विध्यार्जन सुरु आहे . 
पण  अप्पासाहेब एवढ्या लहान वयात एवढ्या भीषण परिस्तिथी तुन कसे काय सुखरूप गेले , हा प्रश्न सगळ्यांचा पडला होता

Chimaji Appa  peshwa bajirao  anuja sathe  and zubair


त्यावर अप्पासाहेब नि आपल्या मातोश्रींना पत्राने कळविले कि त्याने शास्त्र मध्ये अश्या परिस्तिथ कसे मार्ग काढून नदीतून पोहुन बाहेर पडायचे हे वाचले होते , ते त्यांना तिथे उपयोगी पडले . 



No comments:

Post a Comment

२०२५: माझ्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण

  २०२५: माझ्या आयुष्यातील एक सुवर्णक्षण हे २०२५ वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण ' प्रकाश घरत ' परिवारासाठी सुवर्णक्षरांनी लिहून ठ...

Labels