Monday 27 February 2017

एक मराठी ,कोटी मराठी

प्रिय वाचक ,
नमस्कार ,

Kusumagraj


सर्व महाराष्ट्रातील ,देशाच्या  अन्य प्रांतात अभिमानाने मराठी भाषा जतन करणारे ,जगात सर्वत्र पसरलेले आहेत आणि मराठी भाषा संस्कृति ,सण सुधी जपणारे ,जल्लोशात साजरे करणारे मराठी बांधवाना व  भगिनींना व त्यांच्या लेकरांना  आजच्या वि शिरवाडकर म्हणजे 'कुसुमाग्रज ' यांच्या जन्म दिवशी साजरा होणाऱ्या  मराठी भाषा दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा 

आपली मराठी भाषा ज्ञानेश्वर  माऊली , तुकोबा  अगदी संत चोखोबा अगदी अनेक संतांनी त्यांच्या अभंग वाणी ने आणि त्याद्वारे सर्वांना भक्ती मार्गाने नेता नेता वाईट रूढी परंपरा ,अंध विश्वास यातून तत्कालीन समाजाची जनजागृती केली .त्याच प्रमाणे साहित्यात विनोद ,वेगवेगळ्या विषयात माहिती ,तत्वन्यान .कादंबऱ्या ,काव्य यांचे लिखाण करून पु ल  ,वि स ,श्री ना , असे अनेक अनेक लेखक ,लेखिका बहिणा बाई ते शांता शेळके ह्यांच्या सारख्या कवियत्री ह्यांनी मराठी साहित्याला भरभरून दिले ... 



आपली मराठी विदर्भात आहारीनी , तर कोकणात मालवणी , कोकणी होते ,रायगडात आग्री तर समुद्रकिनारी कोळी भाषा होते .लेखन कवितेत शृंगारते गावठाणात ईस्ट इंडियन ख्रिस्ती लोकांच्या संस्कृतीत ती शोभते 


मराठ्यांनी दक्षिणेत आताच्या  तामिळ्नाडून तंजावूर येथे  मराठी साम्राज्य नेले , होळकरांनी मध्यप्रदेशात  , इंदोरला बहरले ,उत्तर भारतात झांशी राणी लक्ष्मी बाई ने राज्य केले 

अशी ही आपली मराठी मुंबईच्या 'कॉस्मोपॉलिटन ' मध्ये  घुस्मटते आहे तिला सर्व मराठी जनतेने पक्षभेद ,जातीभेद ,धर्मभेद ,प्रांतभेद विसरून प्रभावाने जपले पाहिजे मराठीला  हीच भावना प्रत्येक  पक्षाच्या जाहीरनाम्यात ,वचनाम्यात तसेच प्रथम मराठी आणि मराठी माणूस हाच निर्धार सर्वांनी ठेवावा 


Shivaji  Maharaj

एक मराठी ,कोटी मराठी 

जय महाराष्ट्र 

एक निर्धारी मराठी माणुस 




No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels