Friday, 15 June 2018

शिवशाही: अलिबाग ते मुंबई

ShivShahi bus
मित्र हो ,

जवळ जवळ मी एक महिनाभर मी अलिबाग ला होतो मे २५ नंतर,मांडावा गेट वाई ह्या लाँचेस बंद होतात , त्याप्रमाणे त्या २७, २५ मे ला बंद  झाल्या . या वेळी मला इथला पाऊस पाहायचा होता .. त्यामुळे लाँचेस बंद  झाल्या तरी मला काही वाटले नाही .

कारण , यंदा पासूनअलिबाग ते मुंबई  व बोरिवली  मुरुड ह्यांच्या दरम्यान " शिवशाही " नावाची संपूर्ण वाट्णाकुळीत st बस सुरु झाली होती .

मग सुरवातीचा वळवाचा का असेना वीज कङ्कडणयारा धो धो पाऊस मी तिथे एन्जॉय केला . पाऊस रात्री ७ ते ८ वाजता सुरु झाला  आणि धो धो बरसला आजुबा च्या वाडयातील माड , पॉपली , आंब्यांच्या झाड वर सर सर आवाज काढीत बरसला , तिथल्या शिरस्ते प्रमाणे MSEB झाडे त्यांच्या फांद्या पडून विजेच्या तारा पडून घाट पाट हो नये म्हणून विद्युत पुरवठा खंडित केले होते.

त्यामुळे सगळी कडे अंधार होता फक्त अधून मधून विजेचा कडकडाट होऊन फ्लॅश light पडावा तसा आजूबाजूच्या सृष्टीवर पडायचा आणि त्याप्रमाणे आजुबाची झाडे , घरे त्या प्रकाशात धुतली जात होती

काजवे पण चमकू लागले होते, एकंदरीत  विलोभनीय दृश्य होते ते , जे मुंबईत दुर्प्रस्त असते !


दोन तीन वेळी असा पाऊस पहिल्या नंतर' मुंबईत तीळ कामे आठवली आणि परतीचा प्रवास करायचे ठरविले !


शिवशाही बस ने मुंबई ला जायचे असे नक्की झाले असल्याने धाकट्या मुलीने निकिता ने सर्वांची टिकेट्स online बुक केली . www. msrtc .com  हे उपलबध   आहेत !त्यांचा प्रिंट आऊट काढला त्याच्या प्रतयेकी copy सुद्धा काढल्या म्हणूनच आम्ही तिला "google " निकिता असे म्हणतो !


परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब ह्यांनी माझ्या मते st बस मध्ये बरीच सुधारणा केली आहे .  ह्यांनी माझ्या मते बरीच सुवर्ण केली आहे .
ShivShahi bus divakar raote



शिवसेना सतेत असल्यावर चांगल्या गोष्टी होताच असतात ,नाहीतर AC बस अलिबाग ते मुंबई धावेल असे हे इतर पक्ष्यांच्या राज्यात अपेक्षित वाटत नाही .  हे माझ वैय्क्ती मत आहे कोणाला पटेल अथवा नाही !
तर शिवशाही ची प्रत्येक सीट पुशबॅक आहे .  प्रत्येक सीट वर AC चा थंडावा  मिळतो , तो कमी जास्त करता येतो . येथे सोबत सामान ठेवून बसता येते . पाण्याच्या bottles सीट च्या मागील बाजूस ठेवांची वयवस्त केली आहे . तसेच वर्तमान पत्रे , magazines इत्यादी ठेवण्यासाठी सुद्धा जागा केली आहे . शिवाय wifi ची सुद्धा सोय आहे . एकंदरीत प्रवास अराम दायक  आहे !


ShivShahi bus divakar raote


सिनियर सिटिझन्स साठी "half price"  मध्ये तिकीट उपलब्ध आहे !

तर बघा अनुभव घेऊन

आपला प्रवासी मित्र

प्रकाश









No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels