पेशवे बाजिराओ ह्यानी गंगाजी नाईक ह्याना असावस्थ केले व धाकते बंधू चिमाजी अप्पा साहेब ह्याना त्या मोहिमेवर पाठविले।
गंगाजी नाइक व् ेटर मंडळी ह्यानी चिमाजी अप्पा साहेबांची उत्तम साथ दिली। गंगाजी हे सुतार कामाच्या निमित्ताने हेर गिरी करीत असत. त्यामुळे त्यां ना वसई किल्लायाची सम्पूर्ण माहिती झाली होती. त्यांनी ती माहिती पेशव्यांना दिली. किल्ला याच्या माहिती मिलावण्याची कामगिरी गंगाजी नाइक ह्यानी चोख पार पडली. हि बाब शत्रूला नामोहर करायला उपयोगी पडली.
वसई मोहीम जिंकायला जवळ जवळ ३६ महिने लागले. वसई च्या किल्ल्या वर जरीफाटका फडकावयाचा हे स्वप्न चिमाजी अप्पा साहेबांचे होते. म्हणूच ते म्हणले "एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "
इतका त्यांचा स्वराज्यासाठी निर्धार होता. वज्रश्वरी देवि ने त्यांना स्वप्नात येऊन वसई किल्ला जिंक्यचे मार्गदर्शन केले .म्हणूच त्यांनी वसई किल्ला जिंक्यलावर देवीचे मंदिर बांधले. अशा प्रकारे चिमाजी अप्पांचा विजय झाला व पोर्तुगूझ वसई सोडून कायमचे गेले .
पोर्तुगीझ सेनापती ची बायको व मुलगी पेशवायांच्या हातही लागली होतो परंतु शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांनी त्या दोघीना सन्मान पूर्वक पोर्तुगाल ला पाठवले .
हे सर्व असे असताना वसई वर मिळवलेला चिमाजी अप्पा साहेबांच्या विजयला स्वतंत्र्य दिवसाचा दर्जा असावा व त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे व वसई पालघर , मुंबई इथल्या जनतेला हा दिन जल्लोषात साजरा करता ह्यवा असते मला मना पासून वाटते .
पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही आणि त्यांच्या पराक्रमाला कमी लेखणे हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या च्या स्वराजाला कमी लेखण्या सारखेच आहे कारण पेशव्यानी स्वराज्य जपले व वाढवले तसेच ब्रिटिशाचांच्या विश्वासघातकी घातकी भीमा कोरेगाव कारस्थानाला अप्रत्याक्ष गौरवण्यासारखेच आहे .
आपला एक
मराठी माणूस
No comments:
Post a Comment