Tuesday, 26 June 2018

वसई मोहीम 1738 - चिमाजी अप्पा साहेब

vajareshwari temple , vasai
नमस्कार,
पेशवे बाजिराओ ह्यानी गंगाजी नाईक  ह्याना असावस्थ केले व धाकते बंधू चिमाजी अप्पा साहेब ह्याना त्या मोहिमेवर पाठविले।

bajirao - ranveer singh



गंगाजी नाइक व् ेटर मंडळी  ह्यानी चिमाजी  अप्पा साहेबांची  उत्तम साथ दिली।  गंगाजी हे सुतार कामाच्या  निमित्ताने हेर गिरी करीत असत. त्यामुळे त्यां ना  वसई  किल्लायाची सम्पूर्ण माहिती झाली  होती. त्यांनी  ती माहिती पेशव्यांना दिली. किल्ला याच्या  माहिती मिलावण्याची   कामगिरी   गंगाजी नाइक ह्यानी चोख पार पडली. हि बाब शत्रूला नामोहर करायला उपयोगी पडली.

vasai fort - chimaji appa



वसई मोहीम  जिंकायला जवळ जवळ ३६ महिने लागले. वसई च्या किल्ल्या वर जरीफाटका फडकावयाचा हे स्वप्न चिमाजी अप्पा साहेबांचे होते. म्हणूच ते म्हणले "एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "


Chimaji appa - vaibhav tatwawadi



इतका त्यांचा स्वराज्यासाठी निर्धार होता. वज्रश्वरी देवि ने त्यांना स्वप्नात येऊन वसई किल्ला जिंक्यचे मार्गदर्शन केले .म्हणूच त्यांनी वसई किल्ला जिंक्यलावर देवीचे मंदिर बांधले. अशा प्रकारे चिमाजी अप्पांचा विजय झाला व पोर्तुगूझ वसई सोडून कायमचे गेले .
vajareshwari devi - chimaji appa


पोर्तुगीझ सेनापती ची बायको व मुलगी पेशवायांच्या हातही लागली होतो परंतु शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांनी त्या दोघीना सन्मान पूर्वक पोर्तुगाल ला पाठवले .



हे सर्व असे असताना वसई वर मिळवलेला चिमाजी अप्पा साहेबांच्या विजयला स्वतंत्र्य दिवसाचा दर्जा असावा व त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे व वसई पालघर , मुंबई इथल्या जनतेला हा दिन जल्लोषात साजरा करता ह्यवा असते मला मना पासून वाटते .

पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही आणि त्यांच्या पराक्रमाला कमी लेखणे हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या च्या स्वराजाला कमी लेखण्या सारखेच आहे कारण पेशव्यानी स्वराज्य जपले व वाढवले तसेच ब्रिटिशाचांच्या विश्वासघातकी घातकी भीमा कोरेगाव कारस्थानाला अप्रत्याक्ष गौरवण्यासारखेच आहे .

आपला एक 
मराठी माणूस

Thursday, 21 June 2018

वसई मोहीम - चिमाजी अप्पा साहेब

नमस्कार ,


Chimaji Appa Vasai fort



"एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "म्हणाले चिमाजी अप्पा साहेब - वसई मोहीम
vasai fort


वसई बद्दल त्यांच्या कानावर पोर्तुगुएज़ ज्यांच्या हिन्दुना छलान्यांचे व जबरदस्ती क्रिस्चियन करण्य बद्दल ाले होते. अंजुर च्या गंगाजी नाईक आणि ेटर स्थानिकनि हा छल सहन केलेला होता. गंगाजी नाइक हे जारी वयोमनाने मोठे असेल तरी असली लढवय्या होते. त्यांनी पोर्तगीज़ाना खुप वर्ष झुंज दिली होती. 
Gangaji Naik , Anjurkar - Vasai Fort



गंगाजी नाईक ह्यानी संभाजी महाराजन बरोबर मिलूण सुद्धा खुप वर्ष पोर्तुगुएज़ ह्याना झुंज दिल होती. परन्तु दुरदयावने वसई ला स्वंतन्त्र्य मिळण्या पूर्वीच ाम्भाजी महाराजाना औरंगज़ेब ने क़ैद केले।



Amol Kolhe sambhaji



मग नंतर कही काल खंडा नंतर शाहू महाराज छत्रपति झाले व त्यानी पुनहां स्वराज्य च्या चळवळी ला जोमाने सुवात केलि। गंगाजी नाइक हे मुळेचे जाती ने सोमवंशी क्षत्रिय पाठारे। राजा बिंब मदेव ह्यांच्या बरोबर अलाउद्दीन खिलजी ला झुंज देत हां समाज तीनच्या सोबत अला व केलवे माहिम साष्टी पर्यन्त पसरला। राजा भीम देव ह्यानी माहिम ला आपले राजधानी बनवाली। अश्या लढवय्या समाजाचे गंगाजी नाईक हे पोर्तुगुएजान समोर मगर घ्याला त्यार नव्हते। त्यांच्या बरोबर झुंज देता देता टी तरूंचे महातारे झाले होते। परन्तु जिद्द त्यानी सोडली नव्हती। पेशवा बाजिराओ ह्यानी त्याना कल्याण मध्ये वादा सुद्धा दिला होता व िणामदारी ही देऊन त्याना संस्थापित केले होते. तरी सुद्धा वसई ला पोर्तुगुएजान पासून स्वंतंत्र कार्यांची महत्वाकांक्षा त्यानी ुरषि बलागली होती. त्यामुळे त्यानी पेशवे बाजिराओ ह्याना वारंवार विनंती ही केलि होती. एवढच नव्हे तर सौभाग्यवती कशीबाईसाहेब ह्यांची भौ श्री रामचंद्र चास कर   जोशी ह्यांच्या मार्फ़त तिकडच्या परिसिथिति करीत असत.





परन्तु पेशवे साहेब त्यावेलेला दिल्ली च्या मोहिमेवर     असल्या मुले  त्याना वेळ मिळत नव्हता।  

bajirao , kashibai vasai fort


रिफरेन्स 

पेशवे दप्तर 
पोर्तुगीज दप्तर 
कोकणच्या इतिहासाची साधने
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मध्ययुगीन इतिहासाची साधने
पोर्तुगीज मराठे संबंध 
कित्ता पृ. क्र. २४९
साक्षेपत्र
बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी
आंगरेकालीन पत्रव्यवहार 
साष्टीची बखर
राजपुताना का इतिहास 
Maharashtra Archives Bulletin 
Bombay Presidency Gazetteers 
Annual Report Of The Secretariat Record Office




 असा आहे मराठ्यांचा इतिहास। 

Tuesday, 19 June 2018

चिमाजी अप्पा भाग २ : चिमाजी अप्पांचे छंद

नमस्कार ,

Chimaji appa and radhabai , anuja sathe



चिमाजीअप्पा ह्यांनी वेग वेगळ्या औषधी वनस्पती ची एक बाग त्यात केली होतीच त्यांचा एक छंद होता, वेग वेगळी  फळांची व फळांची झाडे सुद्धा त्याणी लावली होती , पूढे शनिवार वाडयात सुद्धा त्यांनी खूप झाडे लावली व त्याला चिमण बाग असे म्हणत .

शनिवार वाडयातील देवांच्या पूजेला चिमण बागेतील फुले तिथल्या दासी फुले गोळा करावयाचे . चिमाजी अप्पा झाडांच्या बाबीत काहीसे हळवे सुद्धा होते . झाडांना  झ्हाले कि त्यांना वाईट वाटत असत व ते त्यांचा उपचार हि करत असत . ते झाडांशी संवाद सुद्धा सध्याचे . हे सर्व चिमाजी लहान पण पासून करायचे , अगदी जेव्हा ते सासवड ला राहत होते तेव्हा पासून .

Chimaji appa , peshwa bajirao


पण त्यांच्या तीर्थरुपां व बंधू बाजीराव ह्यांना सारखे वाटायचे कि चिमाजी हयांनी आपल्या सारखे लढवय्या व्हावे . पण लहानपणी चिमाजी ह्यांना राज दरबारी गायक व्हायची  इचछा होती .  लहानपणी ,संगीत शिकवा असा त्यांचा मनसुबा होता .
Chimaji appa , peshwa bajirao , Balaji vishwanath


त्यामुळे ते लहानपणी युद्धशास्त्र शिकण्या पासून लांबच राहायचे . त्यांच्या मातोश्री राधाबाई ह्यांनी जिजामाता प्रमाणे बाजीराव ह्यांच्या मनात "स्वराज्य" च्या लढ्याचे बीज रोवले होते. त्या स्वतः चिमाजी ह्यांना युद्धशास्त्राच्या शिक्षण द्यायच्या विचारात असायच्या . परंतु लहानपणी चिमाजींना त्यात कधीही रस नवहता . त्यांच्या तीर्थरुपांनी त्यांना फटकारले हि होते . शेवटी कंटाळून त्यांच्या  तीर्थरुपांनी  त्यांना तंजावूर ला युद्धशास्त्र शिकायला पाठवायचे ठरवले .
Chimaji appa , peshwa bajirao , Balaji vishwanath




असे हे चिमाजी अप्पा पुढे युद्धशास्त्रात हि प्रवीण झाले पुढे त्यांनी मुसद्दी सिद्धी , पोर्तुगीज  ह्यांना जेरीस आणले .









Saturday, 16 June 2018

श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब पेशवे भाग 1 (बालपण)

श्रीमंत चिमाजी अप्पा साहेब पेशवे  

Chimaji Appa


थोरले बाजीराव ह्यांचे धाकटे व त्यांचे लाडके बंधू म्हणजे चिमाजी अप्पा , बुद्धिमान अनेक विषयांचे अभयासु म्हणून छत्रपती शाहू महाराज ह्यांनी चिमाजी अप्पा ह्यांना "पंडित"  उपाधी दिली होती, वयाच्या बाराव्या वर्षी !

Chimaji Appa  peshwa bajirao


चिमाजी अप्पा साहेब लहानपणी तब्यतीने तसे नाजूक होते संस्कृत चा त्यांना गाढा अभ्यास होता . तसेच वनस्पती शास्त्र , आयुर्वेद , चाणक्यनीती, भगवद गीता  ह्यांचा त्यांना अभ्यास होता . त्यामुळे ते कित्येकदा घरातल्यांचा लहानपणच घरगुती औषधांनी उपचार करायाचे . तसेच त्यांना संगीताची हि खूप आवड होती, व राज दरबारी गायक वाहावे असे हि त्यांना लहानपणी खूप वाटायचे . 


असे म्हणतात कि लहानपणी जेव्हा अप्पासाहेबांना युद्धशास्त्राचा अभ्यास करायला त्यांच्या घरातील मंडळी सांगायची तेव्हा ते कोणाला हि जुमानत  नवहते .  युद्धशास्त्राच्या  अभ्यासला नेहमी टाळा टाळ करायचे . त्यामुळे त्यांना तंजावूर येथे युद्धशास्त्राच्या  अभ्यासला एकटेच पाठवायचे असे त्यांच्या तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ ह्यांनी ठरविले . ह्याला चिमाजी अप्पासाहेबांच्या  आईसाहेब म्हणजे राधाबाई व बंधू बाजीराव बल्लाळ ह्यांनी विरोध केला .
Chimaji Appa  peshwa bajirao  anuja sathe


पण च्या तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ  त्यांना घेऊन निघाले . त्यांच्या सोबत अप्पासाहेब ह्यांचे बंधू बाजीराव बल्लाळ हे हि आले . त्याप्रमाणे कावेरी नदीच्या किनारी त्यांना नौकेत बसवून त्यांचे  तीर्थरूप श्री बाळा जी विश्वनाथ व बंधू बाजीराव जड पायाने निघाले . 


काही दिवसांनी त्यांना असे कळले कि नदीला पूर येऊन बरीच जीवितहानी झाली होती . त्यामुळे  राधाबाई साहेब ह्यांना  वाटले कि चिमाजी अप्पासाहेबांचे म्हणजे त्यांच्या लाडक्या चिमणा चे काही बरे वाईट झाले असावे म्हणून त्यांनी त्यांचे पती देव श्री बाळा जी विश्वनाथ ह्यांना खूप दोष दिला . 

परंतु काही दिवसांनी तंजावूर च्या राजाचे पत्र आले व त्यांनी चिमाजी अप्पासाहेब चे कौतुक केले कि चिमाजी तेथे सुखरूप असून त्यांचे विध्यार्जन सुरु आहे . 
पण  अप्पासाहेब एवढ्या लहान वयात एवढ्या भीषण परिस्तिथी तुन कसे काय सुखरूप गेले , हा प्रश्न सगळ्यांचा पडला होता

Chimaji Appa  peshwa bajirao  anuja sathe  and zubair


त्यावर अप्पासाहेब नि आपल्या मातोश्रींना पत्राने कळविले कि त्याने शास्त्र मध्ये अश्या परिस्तिथ कसे मार्ग काढून नदीतून पोहुन बाहेर पडायचे हे वाचले होते , ते त्यांना तिथे उपयोगी पडले . 



Friday, 15 June 2018

शिवशाही: अलिबाग ते मुंबई

ShivShahi bus
मित्र हो ,

जवळ जवळ मी एक महिनाभर मी अलिबाग ला होतो मे २५ नंतर,मांडावा गेट वाई ह्या लाँचेस बंद होतात , त्याप्रमाणे त्या २७, २५ मे ला बंद  झाल्या . या वेळी मला इथला पाऊस पाहायचा होता .. त्यामुळे लाँचेस बंद  झाल्या तरी मला काही वाटले नाही .

कारण , यंदा पासूनअलिबाग ते मुंबई  व बोरिवली  मुरुड ह्यांच्या दरम्यान " शिवशाही " नावाची संपूर्ण वाट्णाकुळीत st बस सुरु झाली होती .

मग सुरवातीचा वळवाचा का असेना वीज कङ्कडणयारा धो धो पाऊस मी तिथे एन्जॉय केला . पाऊस रात्री ७ ते ८ वाजता सुरु झाला  आणि धो धो बरसला आजुबा च्या वाडयातील माड , पॉपली , आंब्यांच्या झाड वर सर सर आवाज काढीत बरसला , तिथल्या शिरस्ते प्रमाणे MSEB झाडे त्यांच्या फांद्या पडून विजेच्या तारा पडून घाट पाट हो नये म्हणून विद्युत पुरवठा खंडित केले होते.

त्यामुळे सगळी कडे अंधार होता फक्त अधून मधून विजेचा कडकडाट होऊन फ्लॅश light पडावा तसा आजूबाजूच्या सृष्टीवर पडायचा आणि त्याप्रमाणे आजुबाची झाडे , घरे त्या प्रकाशात धुतली जात होती

काजवे पण चमकू लागले होते, एकंदरीत  विलोभनीय दृश्य होते ते , जे मुंबईत दुर्प्रस्त असते !


दोन तीन वेळी असा पाऊस पहिल्या नंतर' मुंबईत तीळ कामे आठवली आणि परतीचा प्रवास करायचे ठरविले !


शिवशाही बस ने मुंबई ला जायचे असे नक्की झाले असल्याने धाकट्या मुलीने निकिता ने सर्वांची टिकेट्स online बुक केली . www. msrtc .com  हे उपलबध   आहेत !त्यांचा प्रिंट आऊट काढला त्याच्या प्रतयेकी copy सुद्धा काढल्या म्हणूनच आम्ही तिला "google " निकिता असे म्हणतो !


परिवहन मंत्री दिवाकर रावते साहेब ह्यांनी माझ्या मते st बस मध्ये बरीच सुधारणा केली आहे .  ह्यांनी माझ्या मते बरीच सुवर्ण केली आहे .
ShivShahi bus divakar raote



शिवसेना सतेत असल्यावर चांगल्या गोष्टी होताच असतात ,नाहीतर AC बस अलिबाग ते मुंबई धावेल असे हे इतर पक्ष्यांच्या राज्यात अपेक्षित वाटत नाही .  हे माझ वैय्क्ती मत आहे कोणाला पटेल अथवा नाही !
तर शिवशाही ची प्रत्येक सीट पुशबॅक आहे .  प्रत्येक सीट वर AC चा थंडावा  मिळतो , तो कमी जास्त करता येतो . येथे सोबत सामान ठेवून बसता येते . पाण्याच्या bottles सीट च्या मागील बाजूस ठेवांची वयवस्त केली आहे . तसेच वर्तमान पत्रे , magazines इत्यादी ठेवण्यासाठी सुद्धा जागा केली आहे . शिवाय wifi ची सुद्धा सोय आहे . एकंदरीत प्रवास अराम दायक  आहे !


ShivShahi bus divakar raote


सिनियर सिटिझन्स साठी "half price"  मध्ये तिकीट उपलब्ध आहे !

तर बघा अनुभव घेऊन

आपला प्रवासी मित्र

प्रकाश









Thursday, 14 June 2018

बिर्ला मंदिर अलिबाग

बिर्ला मंदिर ,

नमस्कार

Birla Mandir Alibag


अलिबागच्या बिर्ला  गणेश मंदिर ला जायचे असेल तर रेवदंडा खाडी ओलांडली कि एक रास्ता लागतो त्याच एक भाग मुरुड जंजिरा ला जातो तर दुसरा रोहा महाड येथे जातो . रोहा महाड रास्त्यावर हे बिर्ला मंदिर आहे . डोंगरावर आहे . डोंगऱ्याच्या तळाशी तेथे , तुम्हाला गणपतीला वाहण्यासाठी हार फुले दुर्वा नारळ वगरे एका प्लास्टिक च्या टोपलीत विक्रीसाठी घेऊन तेथील ग्रामीण स्त्रिया येतात .

गणेश मंदिरात जाण्यासाठी छान असा प्रवेश द्वार  केला आहे . त्यातील लहान दरवाज्यातून तुम्हाला सुरक्षा रक्षकाच्या तपासणीतून जावे लागते .

Birla Mandir अलिबाग


निसर्ग संपन्न अश्या डोंगरावर हे गणपती मंदिर बिर्ला ह्यांनी संगमलोरी दगडाने बांधले आहेत. मंदिर आतिष य सुंदर आहेत . मंदिरात जयानासाठी अनेक संगम लॉरी पायऱ्या चढाव्या लागतो .

मंदिरायच्या सभोवती सुंदर बाग केली  आहे, तयात विविध फुलांची झाडे आहेत , तसेच नारळाची झाडे आहेत . आत मंदिरात सुंदर गणेश मूर्ती आहे . तेथे "मक्ख चाऱ्याचे दोन पुजारी आहेत . आपण नेले ले हार फुले नारळ इत्यादी वाहतात . एका रोबोटिक पद्धतीने त्यात कुठल्या हि पद्धतीचा भाव वगरे नसतो . नारळाची वाटी आपल्याला प्रसाद म्हणून मिळतो .

गणपती  मंदिराच्या भोवती सूर्य मंदिर, शंकर पार्वती , दुर्गा इत्यादी सांगोमलोरी मुर्त्या आहेत . त्यांच्या चेहऱ्याला देवत्त्व आहे पण ते सर्व बंद दरवाज्या आडून पहावयाचे .

त्यामुळे हे " तेहरीस कोटी देव बंदी हरिलें सीते ला " अशा दशावताराच्या आरतीच्या ओली आठवतात .

मग माझ्या लक्षात आले के गणपती बाप्पा मला येथे निर्विकार का वाटलं !

येथे सुंदर मंदिर आहे . आजूबाजूच्या डोंगरावरचा निसर्ग बघायला मिळतो . प टिपून घेयासाठी आपल्या जवळ कॅमेरा किव्हा मोबाइल नसतो . कारण येथे मोबाइल व कॅमेरा ला परवानगी नाही !

त्यामुळे आपण एक प्रकारे नाराजीने डोंगर उतरता. आता म्हणे हे मंदिर JSW नावाच्या एका कंपनी च्या ताब्यात आहेत !



Birla Mandir अलिबाग






ध्यानवाद


Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels