त्या वेळी मी १८एक वर्षाचा असेंन, दुपार चे ११वाजण्याच्या सुमार असेल आमच्या माहीम येथील तळ मजल्यावर दोन बाजूला १०० ते१५० चौ . फूट. च्या खोल्यांचे मधून एक लांब लचक पासेज इमारतीच्या मुख्य प्रवेश द्वारा पर्यंत गेला होता तिथे मी प्रत्येक खोली च्या बाहेर ठेवलेली पाण्याची पिंप, मिटर बॉक्स, घरातील अडगळ तसेच समोरून येणारी स्त्री अथवा पुरुष त्यांच्या हातातील सामान यांच्यातून मार्ग काढीत, प्यासेज मध्ये फेऱ्या मारत होतो, तोंडात एखाद गाणंही बारीक आवाजात गुणगुणत अस काही करत चालत असायचो असाच एक दिवशी फेरी मारत असताना अचानक जिन्याच्या बाजूचा खोली बाहेर पडत 'माझा बाळ मित्र अन्या, (अनिल)मला पहाताच म्हणाला "पक्या काय करतोस?, चल माझ्या बरोबर मार्केट मध्ये!," " मार्केट मध्ये?,तिथे काय तुझं?" मार्केट म्हटलं की तिथे मटण, कोंबडी अंडी हयाच्या साठी फारतर भाज्या, मिरच्या कोथिंबीर एवढंच! कारण हा ब्राह्मण! असे माझ्या डोक्यात शंका!, "अरे, तू चल तर खर,!"अन्य माझा गोंधळला चेहरा पहात महणाला, तसा मी भानावर येत म्हटलं, "चाल"! आणि त्याच्या बरोबर आज्ञा धारका सारखा इमारतीतून बाहेर पडलो, अन्याच्या हातात एक कापडी पिशवीत एखादी वस्तू, असावी, पण मी काहो त्याला पिशवीत काय ,याची विचार पूस केली नाही.थोडयाच वेळात मार्केट मध्ये प्रवेश केला आणि फळवाल्यांच्या दुकाना च्या बाजूने 'मिरच्या कोथिंबीर ,आले लिंब यांच्या दुतर्फा दुकानातू पुढे उजवी कडे एका दुकाना समोर थांबलो.
दुकान वाले काका अनिल ला पहाताच हसत म्हणाला" या , आज तुम्ही, आला, ह!,बाबा ऑफिसला गेले असतील ना?"अनिल ने होकारार्थी मान हलवीत पिशवीतला डबा काडत म्हणाला, श्रीखंड हवाय पाव किलो ,!" दे तो डबा,"!असे म्हणत त्यांनी तो डबा , तेथे ठेवलेल्या वजन काट्यावर ठेवलं, आणि दुसरी बाजूला वजन ठेवून, डब्याचे वजन केले ,आणि बाजूच्या फ्रिज मधून श्रीखंडाचे भानडे काढून , काट्यावरचे डब्यात श्रीखंड टाकत,ते अनिल शी बोलत होते "कॉलेज ला जातोस ना, एफ वाय सायन्स, करतोस ,बाबा बोलले मला ,गुड !" असे म्हणत त्यांनी श्रीखंड भरलेला डबा अनिल च्या हातात दिला पण त्यांचं बोलणं चालूच होत, " हा कोण सोबत?," माझ्या कडे पहात ते म्हणाले "कॉलेज चा मित्र"? "नाही शेजारी राहतो, अनिल उत्तरला,"असं, !जर एक मिनिट,जर हात पुढे करा, "आम्ही हात पुढे करताच आमच्या हातावर श्रीखंड चमचा चमचा ठेवून म्हणाले "घ्या चव, आणि इथेच सांगा श्रीखंड कसे आहे ते"!आम्हाला जराविचित्रच वाटले पण आम्ही ते पटकन चाखले,'केशर युक्त, चारोळी टाकलेले ,जायफळ पावडर टाकलेले पिवळे गोड मधुर सुगंधी श्रीखंड जिभेवर पडताच ! ते इतके चविष्ट लागले की, यावं रे यावं!" तळव्या वर, एक कण ही ठेवला नाही,"एकदम मस्त"आम्ही एकमेका कडे पहात समाधाने दुकान मालकांना म्हणालो, "अतिशय चविष्ट "! "आम्ही पण आता तुमच्या कडूनच श्रीखंड घेणार"! मी पण, आता पर्यंत गप्प राहिलेलो न राहून पटकन बोलून गेलो. "आवडला ना,अवश्य घेत जा"!ते म्हणाले आणि आम्ही निघालो ,वाटेत चवीचे वर्णन करत.मला ते दुकान वाले काका भावले , मी घरी आलो, आई चुलीवर जेवण करीत होती, म्हणजे स्टोव्ह वर दोन दोन स्टोव्ह। एकावर भात दुसऱ्यावर चपात्या होत होत्या भाजी वरण झालेले होते, आई च्या हातच्या जेवणाचा वास दरवळत होता थोडयाच वेळाने आई ने जेवण वाढले, जेवत असता आई ने विचारलं "कुठे गेला होतास?"आग अन्या बरोबर बाजारात गेलो होतो!,श्रीखंड आणायला,!""बाजारात श्रीखंड आणायला?"आईला प्रश्न पडला. "अग तेच सांगतोय,"एक घास गिळत मी उतरलो,"अग, फळवले ,मिरच्या कोथिंबीर आणि मसाल्यांची दुकाने आहेत ना, त्याच दुकानांच्या रांगेत एक नवीन दुकान आले, आहे, कुणी ब्राह्मण वयस्कर गृहस्त, आहेत, भव्य कपाळ टक्कल असलेले गोरे गोरे पान, घारे डोळे चष्मा घातलेले शर्ट खुंटीला टांगलेला आणि हात असलेली बनियन घातलेले छातीवर पांढरे केस त्या बनीयन मधून दिसत होते आणि आई, त्यातून त्यांचं जानवे डोकावत होत धोतर नेसलेले होते, "!मी आईकडे पाहिले, ती माझ्याकडे वेंधल्या सारखी पहात,होती, मी तिला व्यक्ती चित्र, वाचून दाखवत होतो आणि आईला दुकानातील श्रीखंड व इतर वस्तू ची माहिती ची उत्सचुकता असणार,!"आग आई,तेच सांगतो की त्यांच्या दुकानात ते श्रीखंड विकतात आणि त्यांनी आमच्या हातावर एवढा श्रीखंडचा गोळा ठेवला केशर युक्त जायफळ चारोळी वेलची चा स्वाद असलेले गोड मधुर ,एकदम मस्त, आई आपण पण त्यांच्या कडून घेऊया "!जेवून झाल्यावर पटावरून उठता उठता मी म्हणालो, "अस,अनुया आपण, पण आणखी काय मिळते ते कळले का"? "कळेल ते पण आई श्रीखंड त्यांचे कडूनच आपण अनुया आता दादर ला वगैरे ला नको जायला, हो की नाही?" धुतलेले हात पुसत मी आईला म्हणालो . आणि, त्यानंतर आम्ही त्यांच्या कडून च श्रीखंड आणत होतो आणि ते प्रत्येक वेळी ते अगदी हसत श्रीखंड आम्हाला देत होते, आणि त्यांच्या कडे गायीचे दुधाचे तूप ही चांगले मिळत होते गोडा मसाला इत्यादी हळू हळू ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या कडून घेऊ लागलो घरच्यांना त्या सगळे चवीने आवडत
त्यानंतर, कित्येक वर्षे आम्ही त्यांचेच कडून खरेदी करीत असल्यासने त्यांच्या माझ्यात एक नात जमल्यागत झाले होते,त्यामुळे कधी बाजारात गेलोच दुसरे काही खरेदी साठी तरी मी त्यांना भेटून पुढे जयचोच त्यांनाही बरे वाटायचे, त्यांनतर एक दोन वर्षांनी त्यांच्यात मला थोडा जर फरक जाणवू लागला,दुकातल्या वस्तूही कमी होत होत्या, त्यांच्या बोलण्यात ही फरक झाला होता,कुठेतरी त्यांना तंद्री लागलेली असायची आपण समोर आलो , 'काका"!, अशी हाक मारली तरी, कुठल्या तरी विचारातून जागे झाल्या सारखे आपल्या कडे पहात म्हणायचे"हा,!, काय बोला"!शेवटी एकदा असेच तंद्रीतून, बाहेर आल्यावर त्यांना मी विचारलेच" अलीकडे, काका तुम्ही जरा कुठेतरी विचार करीत असता,"काही नाही असेच कसली तरी आठवणीत जातो, एवढेच"! माझ्या लक्षात आले, की काका उत्तर टाळतात हे, काही महिन्यांनी त्याच्या दुकानात मी खरेदी साठी गेलो ,
दुकानात काका जरा अस्वस्थ वाटले, उगाच काही वस्तूंच्या बरण्या , डबे , फ्रिज उघड झाप करत होते इकडचे तिकडे ,तिकडचे इकडे करीत होते , मी जरासा थांबलो तेथे, त्यांची पाठ होती माझ्याकडे, हाक मारावी का, असा विचार माझ्या मनात आला ,पण एकंदरीत त्यांच्या हालचाली वरून, मी विचार बदलला, नंतर कधी तरी विचारू, अस मनात योजून टिकडणं निघालो,त्यांनी काही मला पाहिलं नसावं, हाक मारलीच तर मग पाहू, असा विचार करत मी माझ्या खरेदीला निघालो.एक दोन महिन्यांनी मी परत त्यांच्या दुकाना जवळ गेलो,दुकान बंद होते मोठे टाळे लागले होते , मी थबकलोच, आज सोमवार नव्हता, बरे बाकी दुका ने व्यवस्थित उघडी होती गिराहिक ही होते , माझ्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून, एका दुकान दाराने मला विचारलेच, "काय त्या दुकान वाल्या म्हाताऱ्या ला शोधता, तो गेला,कोर्टाने काढला बाहेर त्याला , खूप वर्षे चिकटला होता,आता गेला,असा म्हणूनतप छद्मी प्रमाणे हसला,!मला त्याचे बोलणे बरोबर वाटले नाही,तरी पण मी थोडेसे स्मित केले माझी नाराजी लपवत आणि मागे फिरलो,"तुम्ही गिराईक होताना त्यांचा!" माझ्या मागून आवाज आला, मी किंचित वळून " होकारार्थी मान हलवून "हो"!, असे म्हणालो माझ्या लक्षात आले इतर काही दुकानदार ह्या दुकानदाराला सहमत असावे,पुढेतल्या गिराहिक मधून तोंड काढीत मिश्किल पणे हसत ,माझ्या कडे पहात होते ते मी मग तेथून काढता पाय घेतला,आणि नंतर त्या भागात कधी गेलो नाही, फक्त कधी फळ, मिरच्या कोथींबीर घ्यायची असेल तर जावे लागले तरच! .पण तिथं पर्यंतच पुढे नाही.

No comments:
Post a Comment