Thursday, 12 September 2019

खोली नंबर 16...........2 .

काही महिने बंद राहिल्या नन्तर खोई नंबर 16 मध्ये 'राव'  आडनाव असलेला एक तरुण रहायला आला जास्त उंची नसलेला, पण बुटका ही नसलेला, गव्हाळ रंगाचा, टिपिकल बंगलोर चा कुरळे  बारीक केस जणू डोक्याला चकटवल्या सारखे मागे फिरवलेला असा होता.व्यवसायाने तो 'शिंपी'होता, माहीम च्या 'सिटी लाईट' समोर एक दुकान त्याने धंद्या साठी घेतले होते तेथे तो कपडे शिवाय चा त्याचा बऱ्यापैकी धंदा चालत असावा,तो समाधानी वाटायचा, लवकरच तो आजूबाजूच्या शेजाऱ्यांशी मिळून मिसळून वागू लागला त्याचे वागणे रहाणे शेजाऱ्यांना स्वीकारण्या जोगे होते


  तो अविहित होता, पण आमच्या इमारतीती ल,तरुण मुली महिला याना कधी वागणे गैर,अथवा वाईट नजर असलेला वाटलं नाही. तो व्यसनी आढळला त्याला मित्र होते,ते  सोमवारी दुकान इतर दुकानानं प्रमाणे बंद असेल तेव्हा त्याचे मित्र त्याच्या खोलीत जमत गप्पागोष्टी करीत आणि निघून जात अथवा कुठे फिरायला अथवा सिनेमाला जात असत तो साधारणतः १९६०चा काळ होता,तेव्हा पूर्ण 'दारू बंदी 'होती आणि दारू पिणे आता सारखे 'प्रतिष्टे' चे समजले नव्हते . आम्ही अगदी शेजारी च असल्याने ,आम्ही त्याला जवळून पाहिले होते आणि कदाचित त्यामुळेच माझा मोठा भावाशी त्याचे मैत्रीचे संबंध होत, अन्यथा त्याने त्याच्याशी  एक शेजारी म्हणूनच परिचय ठेवला असता मी त्यावेळी10 वर्षाचा असेंन.

             असा ह्या शेजारचा  आम्हा ला जास्त सहवास लाभला नाही .

               ऐके क दिवशी सोमवारी , शेजारच्या 'राव ' आज दुकान बंद असल्याने त्याचे मित्र घरी आले होते गप्पा। टप्पा ,पत्ते असे गेम चालले होते , नाश्ता जेवण  घरीच अथवा बाहेरुन आणले असावे ते अटप्ल्यावर बाहेर जाण्याचा सिनेमा पहाण्याचा कार्यक्रम असावा, म्हणून असेल ते सर्व बाहेर पडले खोलीला टाळे लावले,  आणि गेले राव त्यांच्या सोबतच होता, पण थोडासा नरम होता ,कदाचित बाहेर जाण्याचा विचार नसावा पण मित्रांचा आग्रह असेल आणि त्याला त्यांना नाही म्हणता येत नसेल काय असेल ते असेल पण तो त्यांच्या बरोबर बाहेर पडला. 

पण रात्री जेव्हा त्याच्या मित्रा बरोबर तो परतला,तेव्हा त्याला धरून धरून मित्रांनी आणला एकाने टाळे उघडले आणि राव ला पलंगा वर झोपवलं, त्याला असे का आणले असे जेव्हा आजूबाजूचे शेजारी चौकशी करू लागले तेव्हा त्याच्या मित्रा पैकी एक जण हलक्या आवाजात सांगू लागला की,ते सिटीलाईट थेटर मध्ये चित्रपट पहायला बसले , पण थोड्यावेळाने राव  ला सन्सणून ताप  भरला आणि तिथेच त्याला उलटी झाली आणि त्यातून त्याला रक्त पडले तेव्हा आम्ही त्याला थेटर बाहेर आणून जवळच्या डॉक्टर कडे नेले  . 

तेथे त्याला तपासून औषध इंजेक्शन देऊन घरी आणलें आता त्याच्या ताप उतरतोय आम्ही आहोत त्याची काळजी घेतोय,तुम्ही काही काळजी करू नका,दोघे जण आमच्या पयकी कोणी तरी इथे राहू, हे ऐकल्या नन्तर शेजारचे अशस्वस्त झाल्याने आपापल्या घरी गेले.

             त्यानंतर दोन तीन दिवस झाले पण राव यांच्या तब्बेतीत काही फरक पडला नाही, तेव्हा त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्या साठी त्यांच्या डोकटर ने सांगितल्या वर अंबुलन्स बोलावण्यात आली राव याना स्ट्रेचर वरूनच अंबुलन्स मध्ये ठेवत असताना  एक  दोन कर्मचारी जमलेल्या व हळव्या झालेल्या शेजाऱ्यांना उद्देशून म्हणाले"अहो कशाला काळजी करता, दोन दिवसात याना बरे वाटून सात आठ दिवसात  चांगले होऊन चालत घरी येतील, काय? हॉस्पिटल ची ट्रीटमेंट आहे शेवटी, चला आम्ही निघतो"! असे म्हणत अंबुलन्स चा दरवाजा बंद करताच अंबुलन्स निघाली.


                        टेलरिंग मास्टर, राव यांचे दुकांबन्द राहिले, इथे खोली  नंबर 16 टाळे  लावून शांत होती, इमारतीतील काही तरुण अधून मधून हॉस्पिटल मध्ये राव याना पहायला,जात,आणि ते आले की,आजूबाजूने चौकशी त्याला घेरून  चौकश्या करीत,निराश होऊन एकमेकाला विचारात ,काय होणार,?मग कोणीतरी
आशावादी बोलायचा "काय नाय होणार, येतील ते चार पाच दिवसात,ते अंबुलन्स वाले बोलल्या प्रमाणे, त्यांना अनुभव असतो अश्या पेशंट चा, खाली पिली टेन्शन नाय घ्यायचा"!कामावरून येताना ,थोडीशी घेऊन आलेला, नारू मामा वदला.
                  " 'करणी'नायतर त्याला कोणीतरी 'मूठ 'मारली असणार, उगीच नाय :रक्ताची उलटी झाली आमच्या गावाला.........!"ज्ञानाला बोलत बोलता जगन ने त्याला अडवले "ते बघ, कोणतरी, त्यांच्या पैकीं भाऊ ला सांगत आहेत, चला ऐकूया के बोलतायेत, ते जशे  त्यांच्या जवळ जात होते, तेव्हा त्यांच्या लक्षात येत होते की काही तरी,बरे नाहींअसें आणि त्यांचा अंदाज खरा ठरला,मास्टर राव', आता राहिले  नाहीत, सकाळीच ते गेले डॉक्टरांचं शर्थीचे प्रयत्न राव याना वाचवू शकले नाहीत .

No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels