घराच्या दारातूनच प्रवास सुरु! हो म्हणजे आता पुण्याला जायचे म्हणजे, रेल्वे, शिवनेरी,शिवशाही यानची पुण्यासाठी तिकीट ऑनलाइन नाहीतर स्वतः जाऊन तिकिटे काढा यासाठी घराकडून रिक्षा, बस ने प्रवास करा!.हे जनजत आता केलेच पाहिजे असे नाही तर सरळ 'ओला ,'नाहीतर उबेर टॅक्सी बुक केलीत की टॅक्सी दारात उभी !,बस सामान भर निघा!,त्या प्रमाणे कालच्या शनिवारी 22 तारखेला पुन्याला निघालो सोबत अर्थात बहीण निकू व मावस भाऊ योगेश होताच, आम्ही publicity चे काम करीत असल्याने एक नव्या विद्यार्थ्या संस्थेच्या प्रसिद्धी साठी दोन दिवसांचा आमचं मुक्काम चे सोय संस्था करणार होती 2च्या सुमारास आंम्ही मुक्कामी ,थोडा फार इकडे तिकडे चुकत शोधत पोहोचलो,संस्थांचे चालक मालक यांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला कामाची कल्पना दिली ,आम्ही हिचे कसे हे करू ते त्यांना थोडक्यात कथन केले, समस्थे च्या आवारात शिरत असताना च फोटोग्राफी मध्ये महत्वाचे वाटण्या जोगी काही निवडक गोष्टी टिपत होतो
नंतर चालक आणि त्यांच्या 2 सहाय्यक यांनी इमारतीच्या 3 ऱ्या माळावर नेऊन आमचा फ्लॅट आम्हाला दाखवला.हॉल मोठा होता 3 बेड ची सोय होती स्वच्छ चादरी बेड उश्या यांची सोय होती 2 लहान टेबल्स जॉईंट करून डायनींग टेबल करण्या सारखे होते बाथ रूम टॉयलेट मोठे स्वच्छ होते थंड व गरम पाण्या ची 24 तास सोय होती किचन प्लयटफॉर्म व्यवस्थित इलेक्टरीक शेगडी थोडी फार गरजे पुरती प्लेट्स
कप बश्या लहान मोठे चमचे सूरी असे अन्न खाद्य पदार्थ गरम करण्याची सोय होती फ्रिज असल्यानं उत्तम खाण्याची पिण्याची सोय होती ह्या सर्व सोयी पहिल्या नंतर आम्ही प्रथम एक मागोमाग बाथरूम मधून फ्रेश होऊन मस्त पैकी भूक लागल्याने.
zomato वरून नॉन वेज जेवण मागविले , जेवण मस्त होते, त्याचा आस्वाद घेतला, नन्तर फ्लॅट मधील सर्व सोयीनं चे फोटो घेतले ,मग शनवार पहाण्यास बाहेर पडलो बाहेर प्रथम लिफ्ट चे फोटो घेतले मग लिफ्ट मध्ये शिरून चालू अवस्थेत आतले फोटो काढले, इमारतीच्या स्वागत कक्ष, इमारतीचा दर्शनी भाग, आजू बाजूचा परिसर बंगले इमारतीचे ही फोटो घेतले आमचा मुक्काम 'कर्वे नगर'कर्वे रोड येथे होता परिसर अतिशय सुंदर उच्चभ्रू लोकांच्या बंगले असलेला आहे तेथून आंम्ही रिक्षाने डेक्कन येथे निघालो.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून 'मुठा नदीवरून शनिवार पेठ येथे शनिवार वाडा मद्धे दिल्ली दरवाजातून प्रवेश केला द्वेष मस्तराने जाळण्यात आलेला शनवार वाडा , गट वैभवाचे दर्शन देत उभा होता आम्ही दोघींनी पेशवाईचा बराचसा अभ्यास केला असल्याने तेथे फटोग्राफी करू लागलो , आमच्या सारखे काही जिज्ञासू, तेथे आले होते, बरेच से परदेशी फॉरेनर्स प्रवासी आपसात चर्चा करीत फोटो काढीत काही नोंदीही करत होते,तर काही मुस्लिम कुटुंब आली होती,त्यातल्या काही तरुण मुली बहुतेक बाजीराव मस्तानी सिनेमा पाहिलेल्या असाव्यात त्या तिथे बहुतेक बाजीराव चा शोध घेत होत्या असे त्यांच्या चर्चेवरून दिसत होते असा गमतीचा भाग पण होता.पण काही असेही प्रवासी होते ज्यांना काहीच कळले नसाव, आम्ही मात्र जेवढी माहिती व फोटो ग्राफी करून 'पर्वती'कडे जाण्यासाठी आटो रिक्षा केली .
छ शिवाजी महाराज रोड मार्गे 'लाल महाल पोहोचे पर्यंत पावसाचे टपोरे थेंब पडले उत्सचुकता म्हणून जरा वर पाहिले डोळ्यावरच आणखी टपोरे थेंब पडले पटकन आत सरकले श्रीमंत दगडू शेठ गणपती पर्यंत पोहोचे पर्यंत थेंबांची संख्या वाढली पण वेग ही वाढला आणि धो धो 'वर्षा'व होऊन पुढे जणू पाऊस धारांचा दात पडदा च निर्माण झाला पुण्याचे रस्ते बुडून गेले पुढे प्रेमळ'हनुमान'जाताच तुफान वारे वाहू लागले छत्री रेनकोट शिवाय निघालेले पुणेकरांची तारांबळ उडाली जो तो पावसा पासून एकतर वाहन शोधू लागलो अथवा आसरा शंभू लागला रस्तावरची वाहने तुंबलेल्या बुडालेल्या अवस्थेत रस्त्यावरून वाट काढीत पळत होती आमच्या रिक्षाची तीच अवस्था होती पर्वती च्या पायथ्याशी पोहोच ताच लक्षात आले पर्वत वरून माणसे स्त्रिया वयस्कर, तरुण लहान मुलांना घेऊन घाई घाई ने उतरत घरी जाण्यासाठी वाहने शोधत होती काहीं स्वतःचे वाहन घेऊन आले होते त्यांचे वाहन पर्यन्त हाल होत होते संध्याकाळ चे साडे सहा वाजले असावेत अंधार पसरला होता रस्त्यावरचे दिवे लागले होते तसेच वाहनांचे दिवे लागले ते आपापल्या परीने अंधार दूर ढकलत होते त्यांच्या प्रकाशात पावसाच्या धारा दिसत होत्या एकंदरीत अवस्था पाहून.
आम्ही पर्वती चा बेत रद्द करून रिक्षा नसोडण्याचा निर्णय घेतला रिक्षा चालकाला तसे सांगितले त्यांनी हे मान्य केले पुढे रिक्षा श्रीमंत नानासाहेब रो वरून डेक्कन च्या 'चितळे मिठाई वाले यांचे दुकानवरून बाजीराव रस्त्यावरून शनिवार वाड प्रदक्षिणा घालून विश्राम बाग वाड्या जवळ चितळेमिठाई वालेालो
यांच्या कडून सुतार फेणी,, श्रीखंड लो ण्याचे तूप बाक र वडी इत्यादी योगेश उतरून घेऊन आला.
यांच्या कडून सुतार फेणी,, श्रीखंड लो ण्याचे तूप बाक र वडी इत्यादी योगेश उतरून घेऊन आला.
पुण्य च्या त्या पावसाला पुणेकर अचंबित पणे पहात होते अचानक एवढा पाऊस पूर्व सूचना न देता पडणे हे पुणेरी शिस्तीला बहुतेक धरून नसावे कारण रिक्षा चालक आम्हाला म्हणाला "गेली दहा वर्षे मी पुण्यात आहे असा पाऊस मी कधी पहिलाच नाही, आम्हाला मात्र काही मुंबईकर असल्याने आसचर्य वाटले नव्हते. शिवाय तो म्हणाला तुंम्ही आलात पुण्याला म्हणून तो बरसला असणार"! पुढे तो असाही म्हणाला की मी 'मराठ वाड्याचा 'आहे आमच्या कडे एक थेंब ही पडत नाही,मॅडम तुम्हींमराठवड्याला चला !,मग तेथेही असाच पाऊस पडू दे!खरच सांगतो मॅडम!"ते ऐकून आम्ही हसलो, पण तो मात्र गंभीर होता,आम्हीही त्याला (हसतच) हो ! असे म्हणालो तो पर्यंत आम्ही आमच्या मुक्कामी आलो.त्याचे रिक्षा भाडे दिले आणि निवास स्थानी आलो फ्रेश झालो,योगेश ने तेव्हढ्यात मस्त पैकी कॉफी केली तिचा आस्वाद घेतला थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा डिनर साठी खाली उतरलो.
आता पाऊस थांबला होता, हवेत छान असा गारवा आला होता,जवळच कुमीन कॉलेज लागून असलेल्या अरुंद रोड ला लागून लहान मोठी वेज नॉन वेज बरीच शी हॉटेल्स होती तसेच लहान लहान चार चार गाड्यांवर वडा पाव पासून भाजी पोळ्या, भाकऱ्या वेगवेगळ्या कडधान्याच्या उसळी ,अगदी गरम अश्या उपलब्द्ध होत्या त्यांचा एक असा वास पोटातल्या भुकेला चालवत आम्ही हे सर्व पहात पहात योग्य अश्या हॉटेल शोधत होतो योगेश एक हॉटेल आवडले तो जरा पुढेच चालत होता तो पटकन मागे वळून मला हॉटेल दाखवीत म्हणाला "दीप्ती ताई,हे हॉटेल चांगले वाटते एसी आहे,जाऊया"?मी व निकिता ने हॉटेल पहाताच म्हटले "चल इथेच जाऊ या आणखी काय शोधायचे?" असे म्हणत 'उंबर 'या हॉटेलात शिरलो सोयीच्या जागेवर बसलो वेटर येताच मेनू पाहून ऑर्डर केली बाजरीची भाकरी कोंबडी काळा रस्सा , थोड्या वेळाने वेटरने चिकन कोल्हापुरी कला रस्सा प्लेट मद्धे वाढला,आम्ही चवीने त्यावर ताव मारला आणि पोट भरल्यावर, तृप्त झालो मग थोडावेळ इकडे तिकडे भटकलो रस्ता तरुणाईने फुलला होता मुली शॉर्टस घालून फिरत होत्या कुठल्याही प्रकारे टेन्शन न ठेवता.
अर्थात आमचेही कपडे तसेच असल्याने बरे वाटले आमचा योगेश मात्र मोबाईल वर इंडिया वि अफगाणिस्थान क्रिकेट मॅच पहाण्यात मग्न होता त्याला अफगाणिस्तान जिंकते की काय याचे टेन्शन, पण तेथे आलेल्या सुंदर मुलींना हा आपल्या कडे पहात ही नाही याचे टेन्शन! आणि हे सर्व पहात आम्ही बहिणी एकमेकां कडे पहात हसत लिफ्ट मधून आमच्या फ्लॅटवर आलो.
फ्रेश झालो ,फ्लॅट च्या बाल्कनीत येऊन उभे राहिलो वर आकाश तसे मोकळे झाले होते, आजू बाजू चे बंगले ,छान इमारती आता दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाल्या होते, योगेश अद्याप मोबाईल मद्धे घुसलेलाच होता पण चेहेऱ्यावर टेंशन कमी झाले होते, इंडिया आता जिंकण्याच्या स्थितीत होती आणि इतक्यात फटाके वाजू लागले, आकाशात फटाक्यांची रंगीत उधळण सुरू झाली माळ आवाजाने तडतडू लागल्या चहू बाजूने ही आतषबाजी सुरू झाली होती,योगेश आमच्याकडे बघून हसत होता टेन्शन पार गेले होते,आता थोड्यावेळाने हा नाचतो की काय ,असे आम्हाला वाटले ,नाच चालू होता, पण योगेश चा नसून निकिता तल्लींन खुशीत नाचत होती, जिंकलो म्हणून नाही तर पुणे तिने एन्जॉय ! केले होते, गम्मत म्हणजे आजू बाजूच्या बंगल्यातील तरुण वयस्कर, मंडळी ही हा तिचा नाच गमतीने पहात होती मला मात्र हायसे वाटले कारण प्रकृतीच्या बारीक सारीक तक्रारी आज अजिबात माझ्याकडे तिच्या नव्हत्या.
खाली,तरुणमुलांचा मुलींचा कळलं चालला होता मोठं मोठ्याने ओरडत काई होते,शिट्या मारत होते, वेगवेगळ्या प्रकारचे फटाके वाजवत होते , इकडे आपल्या आनंदात पुणेकर सामील पाहून, योगेश खु श झाला होता आम्ही त्याला म्हणालो"तू पण जा खाली,!त्यावर तो लाजल्या सारखा करत नाही म्हणाला, मात्र खाली चाललेला कल्ला तन्मयतेने पहात होता. तेव्हा निकिता म्हणाली,"ताई, पप्पा, आले असतेतर योगेश ला घेऊन स्वतःच खाली गेले असते"!त्यावर मी म्हणाले"आग, त्यांनी आपल्याला पण नले असते"!यावर आम्ही एकमताने,एकमेकांना टाळ्या दिल्या,आणि मला एकदम आठवलं,की पप्पा मम्मी फोन ची वाट पहात असणार."अरे बापरे"! असे स्वतःशीच बोलत मम्मीला फोन लावून आमची खुशाली detail मद्धे सांगितली,तेव्हा ते ही आनंदी झाले,मग मी ठेवला मग थोडया गप्पा मारून उद्या 'पर्वतीवर'लौकर उठून जायचे व तेथूनच मुंबईला निघायचे ठरवून ,अंथरुणात शिरलो,योगेश ही दिवे घालून झोपी गेलो.
No comments:
Post a Comment