Tuesday, 13 November 2018

गुप्ते मास्तर

bया"bमयामाहीम च्या मूनसिपाल प्राथमिक शाळेत गुप्ते मास्तर हे शिक्षक होते उंच मजबूत शरीरयष्टी  चेहेरा उभा भव्य कपाळ डोक्यावर मध्यभागी केस गेलेले मात्र कानावर दोन्ही बाजूला पिकत असलेले  बारीक  केस भुवया जाडसर खोल डोळे उंच  चेहेरा शांत पण खंबीर असे त्यांचे वर्णन करता येईल तुणच शिकवण्या ची पद्धत सोपी होती। विद्यार्थ्यांना कळेल असे ते शिकवत छडी चा उपयोग त्यांना करावाच लागत नसे ते प्रेमळ पणे विद्यार्थ्यांना वागवत असल्याने मुलांचे ही ते आवडते शिक्षक होते
माझे मोठे बहीण आणि भाऊ हे दोघेही त्यांचे विद्यार्थी होते टेदोघेही अभ्यासात हुशार होते त्यात ते दोघेही दिसायला नाकी डोळे देखणे   व रंगाने गोरे होतें त्यामुळे असेल काही हे दोघेही गुप्ते मास्तरांनचे जर जास्तच आवडते होते.
इथे आमचे वडील नेव्हल डॉकयार्ड मध्ये कामाला असल्याने आर्थिक बाजू उत्तम होती शिवाय तेथून चांगले रेशन मिळायचे चांगले धान्य कडथधान्य लोण्याचे तूप रॉकेल इत्यादी मिळायची शिवाय त्यांच्या कडे सुतार कामाचे ज्ञान असल्याने त्यांच्याकडे काही सुतार काम करायचे असे सर्व चांगले चालत होते ते सर्वांशी चांगलेवागायचे त्यामुळे नातेवाईक आजूबाजूचे शेजारी त्यांना मनाने वागायचे ते धार्मिक वृत्तीचे उपास तपास करणारे होते सगळे ठीक चालत असल्याने त्यांनी भाद्रपदात गणपतीची बालमूर्ती आणू लागले
मुले चांगली शिकत होती  नंतर माझा जन्म झाला  वडिलांनी माझे नाव मोठया आनंदाने प्रकाश असे ठेवले  बाजूच्या काशी विश्वेश्वर मदिरात ते  मला गोधडी त गुंडाळून दर्शनाला नेत असत  असे काही महिने ठीक चालत होते परंतु माझे वडील यांची तब्येत बिघडू लागली आणि मी १० महिन्याचं होत नाही तोच ते गेले आणि आम्ही पोरके झालो मोठया बाही नीला शिक्षण आरधावत  सोडून नोकरी करवी लागली  भावाला लोकांच्या घरी न्युज पेपर टाकणे गणपती उत्सव या वेळी कापूर उदबत्ती  विकणे दिवाळीत उटणे विकणे अशी कामे करून आपले शिक्षण पुरे  करण्याची धडपड करावी लागली
मी घरात वरचेवर आजारी पडू  लागलो आजी सुईण पण करू लगी  आजू बाजू च्या लोह  मुलाना शाळेत नेऊ आ नू लागली.

त्यातल्या त्यात माझ्या आजीचे सकखे भाचे आणि  माझ्या वडील यांचे मामेभाऊंड पेन  वाले
आण्णा म्हात्रे  हे दर महिन्याला एक ठराविक रक्कम न चुकता द्यायचे सनासुदीला जास्त रक्कम द्यायचे अण्णांनी तसे  वडिलांना ते  मृत्यू  शयेवर आसताना दिले  होते त्या प्रमाणे त्या नी ।
मा झा मोठा  भाऊ नोकरी ला  लागे पर्यन्त दिले पुढे आम्हीच त्यांना नम्र प णे थां मबवण्यास सांगितले
गुप्ते मास्टर आना तर त्यांचा आवडत्या विद्यार्थी न च काळजी होतीच   ते अधून मधून भेटायला येत असत.
आणि त तेव्हा माझे दोघेही भावंड  आनंदी असत त्यांच्या शाळेची काळातील चरचा चालायची  मला त्यात एव्हढेच कळायचे की  गुप्ते मास्टर हे माझ्या मोठया भावाला शाळा सुटली की त्यांच्या सायकल वर  बअसवून आमच्या घराजवळ सोडत व पुढे आपल्या घरी जात  ते प्लाझा सिनेमा जवळ एक इमारतीत पहिल्या मजल्यावर खोलीत  त्यांच्या पपत्नी व्हीडिओ मुलानं सह राहत होते त्यामुळे ते माझ्या भावाला वाटेत घरा कवळ सोडत आणि ते माझ्या दोनही भावंडांना आता ते करीत आहेत आणि पुढे काय कसे करणार या बद्दल चर्चा मार्गदर्शन करीत मला त्यातले कशी कळत नव्हते मी आपला काहीतरी खेळात रमलेले असायचो 
मी जेंव्हा ५एक  वरशा चा झालो तेंव्हा पासून हळू हळू मला ते कळू लागले  ते जेंव्हा आमच्या घरी यायचे तेव्हां
एक उंच धडधाकट डोक्यावर साहेबी हॅट असलेले शर्ट पँटीत व्यवस्थित खोचलेला त्यामुळे त्यांचे पोट जरासे मोठं असलेले असे मला दिसायचं ते घरात। शिरता च डोक्यावरची हॅट ते सर्वांशी गालातल्या गालात स्मित करत काढीत व घरच्या ना विचारीत "कसे आहात ठीक
चालले आहेना"? मग त्यांच्या गप्पा सुरु व्हायचा बराच वेळ ते बसायचे आई आजी यांचे कुशल विचाराचे त्याही त्यांच्या व्यथा  आनंदाच्या गप्पा मन मोकळे पणाने ते घरचेच आहेत असे समजून बोलायचे ते काही सल्ला देत मोठया भावंडांच्या प्रगतीने आनंदी होत त्यांना  आणखीन प्रोत्साहित करत माझ्या तब्येतीनीने व्यथित होत आणी एक उदास दृष्टीशकेप माझ्याकडे ते टाकत त्यांच्या ती नजर मला कळायला लागल्या नंतर पुढे पुढे  आवडे नाशी होऊ लागली मात्र ते मी  घरचयन जाणवू न दिले नाही पण मी जेव्हां  सहावी इयत्ता पास झालो त्या नंतर माझी तब्बेत ही सुधारली आणि माझा आभ्यासातली प्रगती ही सुधारली माझ्यात एक प्रकारे कॉन्फिडन्स व्हाडू लागला मित्र ही  चांगले मिळाले त्यांच्या मुळे गणित सारख्या विषयाची भीती  गेली आणि एक नवा प्रकाश पडला !. पण मास्तरांचा नजरेत माझ्या बाबतीत काही फरक पडत  नव्हता ते नेहमी आले की माझ्याकडे नजर गेलीच तर एकाच म्हणायचे " अरे हा आ हे का"?, आता ह्याची ही मला सवय झाली होती आणि घरचे ही हसायचे मूग मी हो  हसायचो!पुढे बरीच वर्षे गेली बऱ्याच गोष्टी घडल्या काहि चांगल्या काही न घडल्या असत्या तर बरें झाले असते अश्या माझ्यास मोठया बहिणीच लग्न झाले मी एस एस सी झालो  नोकरीला लागलो  कला शाखेचे पदवीधर झालो ऑफिस च्या परीक्षा पास झालो भाऊ एल एल बी करून वकिली करू लागला त्यांचे लग्नं झालें मास्तर यांच्या मुलीचे लग्न झाले मुळग्याचालग्नाचं चालले होते ते आता घरो आले की मुलीच्या संसार कसा आनंदात चसला आहे हे खुशीने सांगत बसायचइ हल्ली हल्ली मी च त्यांची चौकशी करत असे हलली ते थोडेसे वर्ध्यक्या कडे झुकसले वाटत होते आता त्यांच्या मुलाचे ही लग्न झाले त्याला मुले ही झाली होती मास्तर आता मी भेटलो की माझी विचार पूस करू लागले होते माझे ही लग्न
झाले मी दुसरी कडे राहत होतो तेथून मी आई ला भेटायला आई कडे यायचो.
जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा जर तू दरम्यान गुप्ते मास्टर येऊन गेले असले तर त्यांचा विषय निघाईचाच!मूग त्यांची ख्याली खुशाली कळायची आतापर्यंत तरी बरेच वेळा चांगल्याच गोष्टी कळायच्या पण पुढे पुढें असे कळायला लागले की मास्तर बरेचसे कष्टी असत त्यांनी दादर ची जगासोडली होती व मुला बरोबर पार्ल्याल या राहू लागले होते पण त्यांच्या सुनेचे आणी त्यांचा पत्नी चे आजिबात पटत नव्हते त्याना दिवसा गणित है गोष्टी चा त्रा स होऊ लागला होता ते त्यांचे मन आमच्या कडे येऊन भाव कडे खुले करायचे ये आता असाह्य झाले होतें  त्यांच्या कडची बरीचशी शल्लक मुलाला जसग घेण्यासाठी दिली होती शिवाय दादर ची खोली विकून त्यातून ही पैसे  त्यांनी मुलीला मुलाला थोडे थोडे  देऊन बसकी बँकेत ठेवले होते त्याचे व्याज आणि पेन्शन
एवढे च त्यांचे आता उत्पन्न होते सुनेचा पगार हा तिचा। साठी आणि मुलांसाठी खर्च होत होता मुलगा बँकेचं लोन व व्याज  यात बरंच स जात होते  हे तसे व्यवस्थित चालले होते परंतु मास्टर आणि त्यांची पत्नी यांचे जीवन घुसमतल्या सारखे झाले होते घरात सुनेचे आणि मुलाचं भांडण व्हायचे तेव्हा तर मध्ये पाडाव की काय करावे हयच पंचाईत व्हायची.
असाह्य अशी त्यांची अवस्था झाली होती माझ्या कडे असे झाले की आईला  प्यारालिसिस चा अटॅक आलमतील माझ्या कडे आणण्यात आले सुदैवाने आम्हाला जवळच एक लेडी फिईओ थेरपिस्ट मिळाली आतिशय प्रामाणिक मेहनती त्या होत्या जरूर वाटेल तेव्हा आईला त्या दम द्यायच्या ओरडाईच्या कधी कधी आम्हाला विचित्र वाटायचे राग पण यायचा ३ ४ महिन्यात आई चालला लागली स्वतः जेऊ लागली स्वतः चे प्रातर्विधी स्वतः करू लागली या दरम्यान मी व मिससेस अडकलो होतो धाकटी मुलगी २ वर्ष6महिन्याची होती तिला मिससेस च्या आईकडे ठेवले होते ती सारखी रडायची तिला भेटलो  सोडायला तयार व्हायची नाही रडायला लागायची जीवाची माझ्या घालमेल व्हायची मग फसवून तिला निघायचो एकीकडे आईची सेवा दुसरीकडे मूली ला लांब ठेवणे सहन होत नव्हते ऑफिस ला ही दांड्या वव्हाईच्या मूग तिकडे पण नाराजी  सांभाळावी लागायची आई आता तिचा घरी जाण्याससाठी मागे लागायला  लागली फिजिओ थेरपिस्ट पण दुसरी कडे कमला जात असल्याने आम्हाला दाखवलेला व्यायाम मी आई कडून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करून  घेत  स्वतःही ती काही व्यायाम ती करू लागली होती तिचा म्हणण्यानुसार तिला काही दि वासाने तिच्या हक्काच्या  ( तिच्या म्हण न्या प्रमाणे) घरी आणून सोडले त्यामुळे मधनतारीच्या काळा त कुठे काइ झाले ह्याची कल्पना मला नव्हती त्या नंतर मी माझ्या नवीन जागेत शिफ्ट झालो धसकसत्य मोठया मुलीला नवीन जागेत आणले मोठीचे नवीन शाळेत प्रवेश झाला धाकटी ला  के जी लाप्रवेश घेतला आणि थोडा नॉर्मल झाल्यावर मी आईला भेटीला तिच्या हक्काचा घरी गेलो.
मला पहातआच तिला आनंद झाला"बरे झाले तू आलास मी वाटच पाहत होते गॅलरी तुन आताच तुझ्या पुढे आले आणि बसले बोल आता !"कशी आहेस बरी आहेस? हो तू कसा आहेस लेकी बऱ्या आहेत?"होसगले ठीक आहे तुझी काळजी घे औषद वेळवर घेत जा जो व्यायाम दिला तो करत जस
जा आणि व्यवस्थित जेव आणलेली फळे। खात जा एव्हडे कर म्हणजे झाले! काय? एका दमातमी तिला सर्व सूचना केल्या " हो बाबा मी ते सर्व न चुकता करेन"! काही औषध गोळ्या काही आणायचा असतील तर मी आणून देतो नको १५दिवसाच्या आणल्या आहेत तू बस आणि बोल'"! त्या प्रमाणे काही इकडच्या तिकडच्या गप्पाझाल्या  आई एकंदरीत बासरी होती फक्त  चालण्यात थोडा प्रॉब्लेम होता आणि  एक डावा हात तेव्हढा काम करीत नव्हता बाकी ठीक होते तेवढेच एक समाधान! बहिणींनी आणून दिलें ला चहा बिस्कीट खाल्ले तसा मी आईला म्हणालो"निघतो मी"! आणि का कुणास ठाऊक मला एकदम गुप्ते मास्तरांची आठवण आली तसा त्यांचा आणि माझा काही भवानी समंध नव्हत्या तसे समंध माझ्या मोठ्या भावंडांचे होते त्यांना तशी अचानक आठवण येणे स्वाभाविक होते पण झाली ते बरे झाले त्यामुळे जे कळाले ते घडलेच नसतं तरमा बरे झाले असते.
काई ग आई, गुप्ते मास्तरांचे बररच महीने काही कळले नहो ना"? ,अरे  बाबा विचारूच नकोस"! फार वाईट  झाले"! " म्हणजे?" मी चकीत होउन विचारले , ",अरे घात झाला ना, मुलगा गेला त्यांन
,चा  काय मी विचारले ?" अरे मोटारसायकल वर होता रात्री अंधारात समोरून दुसऱ्या गाडीच्या प्रकाश झोतानें याचे डोळे दिपले आणि बाजूला उभ्या असलेल्या ट्रक वर आदळला सनी खलास झाला बायको लबाड त्त्याची तेरा दिवस झाल्यास बरोब्बर माहेरी दोन्ही मुलांना घेऊन गेली नंतर काई झाले माहीत नाही तिकडून कुठे तरी लिव्ह लायनसिस वर मुलांना घेऊन राहिला गेली आणि तिकडून सासू सासर्याना कोर्टात खेचलं  जागा विकुन पैसे मागितले, ,मग? मी विचारले मग काय झाला निर्णय जागा विकून पैसे कोर्ट आदेश प्रमाणे वाटून घ्यायचे मास्तरांना पैसे कमी मिळाले त्यांना मुंबईत कुठे जागा मिळणार?".
आई सांगत होती तिला खूप वाईट वाटत होते  माझा मोठा भाऊ त्याना जमेल ते साहाय्य करीत होता  हे सारे ऐकून मनात अनेक विचारांचा जणू घोंढळ माजला का असे त्यांचेव्हावें स्वतः चा पुढला विचार  फारसा न करता स्वताहाची खोली वि कुन मुलाला ब्लॉक घ्यायला पैसे दिले मुलीला पैसे दिले आणि स्वतः आता घर  शोधत साहेत "नट सम्राट" मधल्या नट साम्राट बेलवळकर सारखे विचारतात "घर देताय का घर एका लाचार माणसाला कुणी घर देताय का घर"! विचार करून माझ्या अंगात शहारे आलें एक दीर्घ श्वास मी सोडला आई ला येतो म्हणालो आणि तडक घराबाहेर
पडलो
माझे ही  गुप्ते मस्तरांशी  कुठेतरी भावनिक नाते जुळले होते.
कां

Saturday, 10 November 2018

"रब दि माया "

आम्ही पूर्वी महिमला ज्या इमारतोत राहत होतो तेथे तळमजल्यावर एक सरदारजी कुटुंब राहत होते  सरदार जोगिंदर सिंग म्हणून ते परिचित होते त्यांची पत्नी जस्सप्रीत कौर त्याना चार मुलगे तीन मुली  इव्हाडांचं परिवार होता मी  जेव्हा त्यांना  प्राथम पाहिले तेव्हा1 मी  चार पाच वर्षांचा होतो हेसारदार जोडपे तेव्हाच पिकलेली  म्हणजे दाढी मिशी डोक्यावरचे ते लाम्ब लाम ब केस सरव प या धाऱ्यातून काळे डोकावणारे आडदांड देह मोठे पोट सर्व अंगावर पिकलेले केस  डोक्यावॉर कशी बशी गुंडाळली पगडी रोखू न बघा नरी नजर आ गात सफेद सलवार खमीज  पायात जड जाड व्हाहान ताड ताड चाल णे आसा एकनदारीत त्या चा आ  वतार असायचा ।

मोठाया  मुल ग्याचा आ वता र थोडया बहुत फरकाने सार खच होता .सरदार्जि यांच्या मोठा मुलगा आमरीनदेर हा टॅक्सी चालवायचा सरदारजी ४ ५टॉक्सिज होत्या एक तो स्वतःच चालवायचा एक मोठा मुलगा आणि इतर दोघे बाहेरचे तरुण सरदार  चालवायच सरदार कुटुंब १००चौरस फुटांचा खोलीत राहायचे त्यांच्या खोलीचा रंग उडालेला होता भिंतीवर गुरू नानक आणि दुसऱ्या  भिंतीवर गुरू गोविंद सिंग यांच्या दोन मुलांना आ उरंगजेब याचे सायनिक भिंतीत जिवंत गाडीत आहेत असे चित्र होते त्या वेळे प्रमाणे त्यांच्याकडेही मातीचीच चूल होती  त्यावर पंजाबी पद्धतीचे जेवण शिजयचे घरात जरी स्वच्छतेचं नावाने बोंब असली तरी जेवणाचा वास चांगला यायचा विशेषतः नॉनवेज वेळी जेवण सारदारणी नाहीतर मोठी मुलगी परितांकौर करायची कधी कधी दोघे मिळून करायचे त्यांचा  घरात एक खतीया होती . 

ती पांढऱ्या कापडी पट्ट्या ने एकप्रकारे विणलेली असायची अश्या 4 ते ५ मजबूत खटिया होत्या एक ते घरात वापेरायचे व इतर त्यांचे टॅक्सी ड्रायव्हर रात्री गॅलरीत कुठे ही अस्तव्यस्त टाकून रहिवाशांना त्रस्त करून ते झोपायचे सरदार कुटुंबी दिवसा त्यावर बसून जेवण  थाळी त घेवून जजेवायचे व रात्री त्यावर ताणून द्यायचे
आमच्या इमारतीत 2 चौक होते एकमुध्ये सार्वजनिक नळ होता तेथे तळ मजल्यावर चे भाडेकरू पाणी भरायचे भांडी घासायचे  सरदार जि नचे ड्रायव्हर बिनधास्त चड्डीवर उघड्या वर आंघोळ करायचे त्यामुळे स्त्रिया नची अडचण व्हायची अर्थात सरदारजी जिना त्याची पर्वा नवहती त्याच चौकात सारदारणी ने एक तंदूर आणला होता. 

सरदारणी त्या तंदूर मधे कधी कधी संध्याकाळी लाकडे घालून ती ते रॉकेल टाकून पेटवायची मोठी आग झाली की मग  ती परातीत मळून आणलेलं पिठाचे गोळे करून हातावर गोल थापटून रोट्या करायची रोट्या तुपात ल्या असायच्या त्या ती धग धगत्य या तंदुरात आतल्याबाजूला सर्वत्र लावायची मूग ती थोडया थोड्या वेळाने आलतुं पालटून पुन्हा त्याच पध्दतीने शेकून तिचे समाधान झाले एक एक बाहेर काढून दुसऱ्या परातीत जमा करायची.aQनन्तर घरा तील मंडळी त्यावर चिकन मटण
सोबत ताव मारायची कधी कधी आम्हालाही रोट्याचं आस्वाद मिळायचा रोट्या तयार होत असताना खमंग
वास सुटलेला असायचा दुसऱ्या दिवशी काही शेजारी त्या तुंदूर रात लाकडाचा झालेला कोळसा घेऊन घरातील चूल पेटवायचे.

म्हणजे बघ ला कडणी जळून कोळसा झाले तरी पण दुसऱ्याचनची चुलीवर अन्न शिजवून दिले.
सरदार कुटुंब आ पल्याच व्यवहारात मश्गुल असायचे तरी पण चाळीत ली काही मंडळी उपद्व्यापी होते त्यांना काहींना काही खुसप त काढायची सवय होती आम्ही कोणाच्या आध्यात मध्यात नासायचो वडील त्यांच्या  ऐन उमेडीची गेल्याने माझी आजी आई मोठा भाऊ बहीण पोटाच्या शिक्षण पुरे करण्या मागे लागसले होते माझी आई आजी उपास तपास करणारे व्रत ठेवणारे सोविल्याने जेवनकारणारे होते तसेच काही ठराविक इमारतइतिल लोकानांशी आमचा संबंध असायचा के शिकलेले सावरले होते आमच्या वडलांना ते ओळखत होतें  पण उपद्व्यापी मंडळी ना ते विनाकारणरयाखुaपत असायचे.

एक दिवशी ती सारदरिंन आमच्या खोलीत अचानक शिव्या देत शिरली आई आणि आजी घरात होत्या त्या एकदम गडबडून गेल्या त्यांना काही सुचत नव्हते  सरदरिंन एकदम पिसाळलेल्या गत ओरडत होती ती सगळे पंजाबी त बोलत होती हातवारे करत होती तिचा आम्ही काय गुन्हा केला होता हे काहीच कळायला मार्ग नव्हता तिला आवरणे हे ही कठीण होते तिच्या हातात टिनपोट होते ते सरळ टईने हुंड्यात बुडविले आणी ती पंजाबी पद्धतीने हिंदीत बोलली"हुमको गंडे बोलते हो ना तो ऐसाही करेंगे;क्या समजे?" असे म्हणत ती तर  तार निघून गेली आई आजी एकमेका कडे बघत च राहीले.

संध्यकाली नळाला पाणी आल्यावर आई ने तो हंडा अनेक वेळा  शेगडीतील मातीने घासून घासून धुतला मग तो पाण्याने अनेक वेळा भरला  ओतला पुन्हा भरला त्यातील पाणी कित्येक दिवस प्यालो नाही मात्र इतर कामासाठी वापर ले एव्हाना काय घडले ते सर्वांनाच कळले होते पण  कोणी बोलत नव्हते काही वर्षे गेली मुले मोठी झाली त्यांच्यातले मैत्री सांभाध व्हाडले  समज पणा व्हाडले सरदारजी च्या मुलीचे लग्न जमले जावई मुलीवर लट्टू होता सारखा तिच्यामागे मागे लागायचं शेवटी एकदाचे लग्न झाल.

आमच्या इमारतीच्या मागे मोठं मैदानहोत लग्नाच्या जेवणाली साठी मोठ्ठा मंडप बांधण्या त आलाहोता जेवणाली च्या आदल्या दिवशी रात्री उशिरा १०० पेक्षा जास्त  गावठी कोंबड्या सटासट कापण्यात आल्या दुसऱ्या दिवशी लग्न सोहळा पार पडल्यानंतर सगळी व्हारा दि मंडअळी कोंबडी व रोट्यान वर  ताव मारण्या साठी इथे आली आणि तृप्त होऊन बाहेर पडली तर असा हा सोहळा पार पडला  सरदारजी मोठा मुलगा टॅक्सी चालवत असला तरी संध्याकाळी त्याच्या वयाच्या मुलांना म्हणजे मित्रांना घेऊन तो चौपाटी वगैरे ठिकाणी फिरायला न्यायचा खायला वगैरे घालून परत घरी घेऊन यायचा त्यांच्या त माझा मोठा भाऊही असायचा त्यामुळे की काय माझ्या मोठया बहिणी च्या लग्नच्या दिवशी स्वतः सरदार जिनी आम्हाला लग्नाच्या हॉल वर सोडले अर्थात त्यांचे टॅक्सी भाडे आम्ही दिले.

काही वर्षं गेली माझ्या वयाच्या आधीचे मूलगे मुली मोठ्या झाल्या मुलगे कुठल्या ना कार्यालायआत कामाला लागली सरदारजी च्या घरात आजून दोन  मुली तारुण्य आत येत होती दुसऱ्या दोन मुळग्यांना दाढ्या मिश्या आल्या होत्या एकंदरीत परिस्थिती हाताबाहेर (घरा बाहेर)  चालली होती खोली पुरत नव्हती हे सरदारजी च्या लक्षात येत होते तो मोठी पण परावडण्या सारखी जागा शोधू  लागला शेवटी  त्याला तशी जागा उपनगरात म्हणजे गोरेगाव येथे मिळाली सरदारजी ने इथली खोली विकली.

आणि एक दिवशी तो दिवस उजाडला सारदार्जिणे खोली रिकामी करण्यास सुरुवात केली त्यांचे घरातले सर्वं पहाटे लौकर उठुन निघुन चांगले कपडे घालून तयार झाले लग्न झालेली मुलगी जावई पण निरोप द्यायला आले होते खोली रिकामी होता होता सारदारणीचा मनात काय आले माहीत नाही ती तडक निघून आमचा घरात आली माझ्या आईला आजीला मिठी मारीत डोळ्यात पाणी आणत म्हणू लागलीं मुझे माफ करो बेहेना दुसरोनका सूनकर मैने गालात किन्नदा गॅलिया देनदी एकदम गल्त किन्नदा  

माझ्या आजी आईला काही सुचत नव्हते एकतर त्यांना धड हिंदी बोलता येत नव्हते ना कशी प्रतिक्रिया द्यावी हे कळत होते मोठा भाऊ त्याचा ऑफिस ला गेला होता मी तर अश्या बाबतीत अज्ञानी होतो  पण माझी आई त्यातल्या त्यात कसेबसे हिंदीत बोलून तिची समजूत घालत तिचा मिठी ला प्रतिसाद देत होती आजी पण तसच करण्याचा प्रयत्न करीत होती इतक्यात तिथे स्वतः सरदारजी तिला शोधत आला  "ऑई तू इथें है की करत तू इथे" ? "मिळणे आनंदीबस!" चाल जलदी नि कल"! असे म्हणाला आणि आमच्या कडे  पहात प्रथमच   तो आमच्याशी हसला तेंव्हा त्याचे गाल फुग्या सारखे फुलले त्यावरचे त्याचे दाढी मिशीचे काळे पांढरे केस फुलून उठल्या सारखे मला वाटले  त्या जंजाळातून त्याचे ओठ आणि दातून ने घसलेलेले दात आम्हाला जेमतेम  तें हसण्याचा प्रयत्नात आहेत हे कळाले त्यानं आईआजीला नमस्कार केला आजीने व आईने   सुद्धा हसत नमस्कार केला  त्यांनी  तो स्वीकारल्या सारखी चेहरा करीत बायको ला म्हणला " ओये  जलदी चाल"!

असे म्हणत तो निघाला मग सरदारणी शुद्ध आई आजीचे हात पकडीत म्हणाली आपणे बहोत मेहेनत की है बडा बेटा नोकरी करता है ना अभी माझ्या कडे पाहत म्हणाली ये भी थोडे दिनओ मे कमाने  लागेग  फिर तुम को आराम ही आराम मिळे गा देख मेरी जबाण है  असं म्हणत ती निघाली. काही पावले चालल्या वर तिने तिच्या खोलीकडे न कळत पणे खोलीत कडे पाहिले  खोलीला आता नवीन टाळे लागले होते . ती थांबली आणि ती पूटपूट ली   " रब दि माया " !

काही  वेळ ती थबकली पण ताबडतोब  ती पटापट पावलं टाकत इमारतीच्या बाहेर पडली सरदारजी तिची वाट च पाहत होता त्याने पटकन त्यांची टॅक्सी  चालू केली सरदारणी त्याच्या  बाजूला बसली टॅक्सी समोरचा रस्ता क्रॉस करून उजवीकडे उपनगर च्या दिशेने निघाली  ....  

आता आम्हाला यापुढे पंजाबी भाषा ऐकाला मिळणार नव्हती ऑई पूत्तर की केंदा कितथे जनदा ल
ऑई 'तेरी 'तेरी    तों तुस्सी जवाब नै सासरीअकल  राब दि  माया  चाल ओये !"  ह्याची कुठेतरी उणीव मात्र जाणवत राहिली कारण आता आता कुठे सर्व शेजारी एकमेकांना समजू लागले मुलांच्या मध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले होते त्यांत हे सरदारजी कुटुंब ही अपवाद नव्हते !'

.

Tuesday, 23 October 2018

रेल्वे चा गोंधळ

mumbai local trains
काल   मला संध्याकाळी दादर ला जायचे होते, सोबत पत्नी  व  मोठी मुलगी , अंधेरीच्या प्लॅटफॉर्म नंबर ५ येथ आलो 
पण तेथे  बांद्रा  साठी ट्रेन आली होती . पत्नीला म्हणालो आता ट्रेन चा गोंधळ होणार आणि तसेच झाले  platform  नंबर 4 येथे स्लो विरार  होती . 

४. ४८ ला  सुटली ती जाताच त्याच प्लॅटफॉर्म वर दुसरी विरार साठी ट्रेन आली परिणामी प्लॅटफॉर्म ५ वरच्या सर्व गाड्या २० मिनिटांनी येऊ लागल्या . त्यामुळे गाडीत चढणाऱ्या उतरणाऱ्या मद्धे धाकाला धाकली होऊ लागली बायका पडल्या त्याच्यात चुकामुक झाली तिथे दोन लेडीज जेन्टस पोलीस होते , पण काहीही मदत करीत नव्हते ,तेव्हा जर अश्या वेळेला  चेंगरा चेंगरी मी अपघात होऊन जीवित हानी  झाली असती तर त्याला रेल्वेच जवाबदार नाही का?




Sunday, 7 October 2018

माझ्या मुली च्या शाळेचा lunch time

नमस्कार

नमस्कार ,



माझी  मुल्गी दिपती  माहिमच्य कनोसा हायस्कूल मधये शिकत होती तिची  आजी व  मामा शाळेत डबा पाठ व्हायचे . त्यात हटकून नॉन वेज असायचे सुरमाई , पापलेट ,बांगडे, खेकडे ,कोल्ंबी ,करंदी ,चिकन मटन रस्सा व फ्राय  ईत्यादि  .

lunch time story


तिच्या  ग्रुप मध्ये  ब्राह्मण व   कायस्थ  मैत्रीणी होत्या , त्या सगळया  एकत्र जेवायच्या डबेवाला डबा ठेवून जायचा . तिच्या मत्रिणी तिला डबा  उघडून व त्यातले छोटे डबे काढून द्याच्या कारण दीप्ती १००% सांडवणार . तिच्या  ब्राह्मण  मैत्रिणी तिला डबे काढून व मांडून द्याच्या. तिच्या डब्या मध्ये मासे अथवा  खेकडे ,कोल्ंबी ,करंदी ,चिकन मटन रस्सा असल्यास त्या मसालेदार रस्याला  छान असा खमंग वास असायचा  मग त्यातल्या एखादीला  राहवयचे  नाही मग  तिच्या  झिबेला पाणी सुटायचे व ती म्हण्याची काय ग फार झोम्बताय का झीबेला ? आणि आपसात  एकमेकीन कडे  पहात त्या म्हणायच्या   आपण रस्सा  खाल्ला तर चालतो, allowed  आहे ,नाही का गं ? मग आपसात एके मेकीं बरोबर काही तरी बोल्याचे  आणि मग त्यातील  एक जण बोलायची कि आम्हाला थोडीशी फक्त "gravy " दे. दीप्ती च्या आजी ला कल्पना असायची म्हणून तीला थोडा रस्सा जास्त दिलेला असायचा .

त्या सगळ्या जणी उचचभ्रु कुटंबत्याला होत्या .त्यांना आमच्या जातीचे म्हणजे skp  पद्धतीचे जेवण खूप आवडायचे .आमच्या सासूबाई ह्या साष्टीकर होत्या .  सांगायचे तातत्प्रय "चवीवर कुठल्या हि जातीची मक्तेदारी नसते "

lunch time story





Tuesday, 2 October 2018

सिटी लाइट आणि गोपीटॅंक मार्केट

नमस्कार,

सिटी लाइट सिनेमा जवळ राहणे खुपच चांगले करमणुकी की साठी  सिनेमा थिएटर का ही  मिनीटवर हात   जोदुन उभी  पण सिनेमा इतका  बंडल की कोणी  थिएटर मध्ये फिरकत नाही फार  फार  तर  टीवी वर यायची  वाट  पहातात।   फिरण्या साठी शिवाजी  पार्क हाथ पसरुन तर दादर चौपाटी लाटांनी  भिजून  पायाला गुडगुल्याकरयाला उत्सुक  अगदी अंगवार तरंगायला घ्याला  हि तयार .


Shivaji Park

Dadar beach


श्रावण संपला गौरी गणपती झाले कि माझी  आजि  गणपती पाठोपाठ गोपीटॅंक  बाजार मध्ये  धावायची  पाठोपाठ  सारस्वत ,कायस्थ, सोनार, शिंपी आप्पा मागे पुढे असाय चे जणू  मेरथॉन स्पर्धा बोंबील ,पापलेट, बांगडे  विचरु नाका जत्राच जशी कही ...
fish fish at citylight market


आजी चा मच्ची घेता घेता, बाजाराचा वाटा बघताना कुणी भेटला तर असा संवाद आसायचा  कि  महाग आहे बाजर पापलेट रावासाला  तर  हाताचं लावायला  नको . कोलंबी  करंदि  चा  वाटा  घेतला  वादितल्या  क्रिस्टी ऑंटी चा संवाद " वन वाटा ऑफ  बोंबील man   5 बोंबील 10 रुपीस  एन करंदी man  दॅट अल्सो फॉर 10 रुपीस man   खूप महाग , व्हेरी कॉस्टली man  "

citylight fish market


मुसलमान महिलीही आपल्या म्हाताऱ्या नावडत्या सासर्याला घोष कसे पाचट नाही त्यामुळे
महाग मासे घ्यावे  लागतात ह्याची तक्रार करत मासे घेत. मासे सगळ्यांचा हवे असतात व ते प्रत्येक जाब आपलय पद्धतीने चविष्ट बनवण्याचा प्रयत्न करीत असतो , चवीवर सारस्वत किंव्हा कायस्थ ह्यांची ची मकतीदारी नाही ....

पुढच्या ब्लॉग पोस्ट मध्ये माझ्या मुलीची आठवण सांगतो ...

धन्यवाद

Tuesday, 17 July 2018

Chimaji Appa Vijay Utsav

नमस्कार वाचक,
Chimaji appa church bell at bhimashankar temple


दिनांक १२/०२/२०१८ च्या dna ह्या वृत्तपत्रात पान २ वर माझ्या वाचनात    आले कि वसईतील काही मंडळी अघोरी विद्येचे अवलंब करत आहे आणि कुणी तरी त्यांच्या बद्दल अंधविश्वास नीरमुलून कायद्या खाली पोलिसानं  कडे तक्रार केली आहे .


अश्या कृत्त्यां बद्दल आता पर्यंत तरी मला काही माहित नवहते किती तरी वसईच्या मित्र मैत्रिणी माझ्या बरोबर कामावर होते (क्रिस्टी व हिंदु ). माझे कित्येक वसईचे  क्रिस्टी मित्र मैत्रिणी ते कसे आधी हिंदू होते व पोर्तुगूइझनी त्यांना बाटवले असे ते सांगत असत. काही जण आपण कसे साम वेडी ब्राह्मण आहोत आता जरी क्रिस्टी असलो तरी असे अभिमानाने सांगत असत पण कुठे हि त्यांनी वसईत होत असलेल्या (कथित)अघोरी विद्येचा उल्लेख केला  नवहता .

अलीकडे श्रीमंत चिमाजी अप्पा बल्लाळ पेशवे ह्यांनी वसई लढाई जिंकली तो दिवस अतिशय आनंदाने व अभिमानाने साजरा करतात . तसेच श्रीमंत चिमाजी अप्पांचा भव्य दिव्य पुतळा वसईत दिमाखाने उभा आहे.

असे असताना देखील तेथील काही  वसईकर मंडळीं नि मात्र ह्या विजयउत्सवाला विरोध केला. कारण चिमाजी अप्पानी चर्च मधल्या घंटा हिंदू च्या देवळात लावल्या . आपला देश निधर्मी आहे , पोर्तुगूज काही आपले नाहीत , चिमाजी अप्पानी परदेशी ताकदिला  विरोध केला व हरवले ,ह्याचा  आपल्या सगळ्यांना अभिमान वाटायला हवा. मग तो कुठल्या धर्माचा व जातीचा असुदे. पण त्याच वसईत त्यांच्या विजयउत्सवाला विरोध  होतो ,ह्याचे मला आश्चर्य वाटते ?

Chimaji appa



श्रीमंत चिमाजी अप्पा ह्यांनी जेव्हा वसई मोहीम जिंकून ते पुण्याला परतत होते त्या वेळेला ते वाटेत  खूप आजारी पडले . एखादा जेता जेव्हा मोहीम जिंकून  परत आपल्या प्रांतात येतो तेव्हा त्याचे भव्य दिव्या स्वागत होते . तेव्हा जेता मोठ्या जलौषात जात असतो .

त्याच अपेक्षे ने चिमाजी अप्पांचे थोरले बंधू श्रीमंत बाजीराव पेशवे त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले होते तेव्हा त्यांनी पहिले कि चिमाजी अप्पा घोड्यावर नसून पालखीत आजारी होऊन पहुडले होते . ते पाहून श्रीमंत बाजीराव ह्यांना खूप दुःख  झाले . त्यांच्या डोळ्यात अश्रू आले

श्रीमंत चिमाजी अप्पा आजारी होणे काही कळत नाही . तुम्हाला काय माहित आहे  का बघा ?

आपला शिव प्रेमी

एक मराठी बांधव


रेफरन्स लिंक्स


https://www.thehindu.com/news/cities/mumbai/news/miracle-healer-booked-under-black-magic-act/article8177848.ece

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Villagers-at-Vasai-hurl-stones-at-church-goers/articleshow/5282489.cms

राऊ नॉवेल

वसई मोहीम





Tuesday, 26 June 2018

वसई मोहीम 1738 - चिमाजी अप्पा साहेब

vajareshwari temple , vasai
नमस्कार,
पेशवे बाजिराओ ह्यानी गंगाजी नाईक  ह्याना असावस्थ केले व धाकते बंधू चिमाजी अप्पा साहेब ह्याना त्या मोहिमेवर पाठविले।

bajirao - ranveer singh



गंगाजी नाइक व् ेटर मंडळी  ह्यानी चिमाजी  अप्पा साहेबांची  उत्तम साथ दिली।  गंगाजी हे सुतार कामाच्या  निमित्ताने हेर गिरी करीत असत. त्यामुळे त्यां ना  वसई  किल्लायाची सम्पूर्ण माहिती झाली  होती. त्यांनी  ती माहिती पेशव्यांना दिली. किल्ला याच्या  माहिती मिलावण्याची   कामगिरी   गंगाजी नाइक ह्यानी चोख पार पडली. हि बाब शत्रूला नामोहर करायला उपयोगी पडली.

vasai fort - chimaji appa



वसई मोहीम  जिंकायला जवळ जवळ ३६ महिने लागले. वसई च्या किल्ल्या वर जरीफाटका फडकावयाचा हे स्वप्न चिमाजी अप्पा साहेबांचे होते. म्हणूच ते म्हणले "एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "


Chimaji appa - vaibhav tatwawadi



इतका त्यांचा स्वराज्यासाठी निर्धार होता. वज्रश्वरी देवि ने त्यांना स्वप्नात येऊन वसई किल्ला जिंक्यचे मार्गदर्शन केले .म्हणूच त्यांनी वसई किल्ला जिंक्यलावर देवीचे मंदिर बांधले. अशा प्रकारे चिमाजी अप्पांचा विजय झाला व पोर्तुगूझ वसई सोडून कायमचे गेले .
vajareshwari devi - chimaji appa


पोर्तुगीझ सेनापती ची बायको व मुलगी पेशवायांच्या हातही लागली होतो परंतु शिवाजी महाराजां प्रमाणे त्यांनी त्या दोघीना सन्मान पूर्वक पोर्तुगाल ला पाठवले .



हे सर्व असे असताना वसई वर मिळवलेला चिमाजी अप्पा साहेबांच्या विजयला स्वतंत्र्य दिवसाचा दर्जा असावा व त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे व वसई पालघर , मुंबई इथल्या जनतेला हा दिन जल्लोषात साजरा करता ह्यवा असते मला मना पासून वाटते .

पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही आणि त्यांच्या पराक्रमाला कमी लेखणे हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या च्या स्वराजाला कमी लेखण्या सारखेच आहे कारण पेशव्यानी स्वराज्य जपले व वाढवले तसेच ब्रिटिशाचांच्या विश्वासघातकी घातकी भीमा कोरेगाव कारस्थानाला अप्रत्याक्ष गौरवण्यासारखेच आहे .

आपला एक 
मराठी माणूस

Thursday, 21 June 2018

वसई मोहीम - चिमाजी अप्पा साहेब

नमस्कार ,


Chimaji Appa Vasai fort



"एकतर किल्ला काबीज करा किंवा तोफांमध्ये माझ्या शरीराला घाला आणि त्या किल्ल्याला त्याने आग लावा "म्हणाले चिमाजी अप्पा साहेब - वसई मोहीम
vasai fort


वसई बद्दल त्यांच्या कानावर पोर्तुगुएज़ ज्यांच्या हिन्दुना छलान्यांचे व जबरदस्ती क्रिस्चियन करण्य बद्दल ाले होते. अंजुर च्या गंगाजी नाईक आणि ेटर स्थानिकनि हा छल सहन केलेला होता. गंगाजी नाइक हे जारी वयोमनाने मोठे असेल तरी असली लढवय्या होते. त्यांनी पोर्तगीज़ाना खुप वर्ष झुंज दिली होती. 
Gangaji Naik , Anjurkar - Vasai Fort



गंगाजी नाईक ह्यानी संभाजी महाराजन बरोबर मिलूण सुद्धा खुप वर्ष पोर्तुगुएज़ ह्याना झुंज दिल होती. परन्तु दुरदयावने वसई ला स्वंतन्त्र्य मिळण्या पूर्वीच ाम्भाजी महाराजाना औरंगज़ेब ने क़ैद केले।



Amol Kolhe sambhaji



मग नंतर कही काल खंडा नंतर शाहू महाराज छत्रपति झाले व त्यानी पुनहां स्वराज्य च्या चळवळी ला जोमाने सुवात केलि। गंगाजी नाइक हे मुळेचे जाती ने सोमवंशी क्षत्रिय पाठारे। राजा बिंब मदेव ह्यांच्या बरोबर अलाउद्दीन खिलजी ला झुंज देत हां समाज तीनच्या सोबत अला व केलवे माहिम साष्टी पर्यन्त पसरला। राजा भीम देव ह्यानी माहिम ला आपले राजधानी बनवाली। अश्या लढवय्या समाजाचे गंगाजी नाईक हे पोर्तुगुएजान समोर मगर घ्याला त्यार नव्हते। त्यांच्या बरोबर झुंज देता देता टी तरूंचे महातारे झाले होते। परन्तु जिद्द त्यानी सोडली नव्हती। पेशवा बाजिराओ ह्यानी त्याना कल्याण मध्ये वादा सुद्धा दिला होता व िणामदारी ही देऊन त्याना संस्थापित केले होते. तरी सुद्धा वसई ला पोर्तुगुएजान पासून स्वंतंत्र कार्यांची महत्वाकांक्षा त्यानी ुरषि बलागली होती. त्यामुळे त्यानी पेशवे बाजिराओ ह्याना वारंवार विनंती ही केलि होती. एवढच नव्हे तर सौभाग्यवती कशीबाईसाहेब ह्यांची भौ श्री रामचंद्र चास कर   जोशी ह्यांच्या मार्फ़त तिकडच्या परिसिथिति करीत असत.





परन्तु पेशवे साहेब त्यावेलेला दिल्ली च्या मोहिमेवर     असल्या मुले  त्याना वेळ मिळत नव्हता।  

bajirao , kashibai vasai fort


रिफरेन्स 

पेशवे दप्तर 
पोर्तुगीज दप्तर 
कोकणच्या इतिहासाची साधने
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मध्ययुगीन इतिहासाची साधने
पोर्तुगीज मराठे संबंध 
कित्ता पृ. क्र. २४९
साक्षेपत्र
बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी
आंगरेकालीन पत्रव्यवहार 
साष्टीची बखर
राजपुताना का इतिहास 
Maharashtra Archives Bulletin 
Bombay Presidency Gazetteers 
Annual Report Of The Secretariat Record Office




 असा आहे मराठ्यांचा इतिहास। 

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels