Tuesday, 4 July 2017

'अमीन मंझिल '

प्रिय वाचक,
नमस्कार,

आपण कधी  माटुंग्याला  गेला आहेत का ? माटुंगा म्हणजे  वेस्ट माटुंगा ईस्ट नाही .
तो H कटारिया मार्ग पुढे लेडी जमशेदजी रोड ला मिळतो आणि जेथे सिटी लाईट  सिनेमा आहे पूर्वी  श्री,बदल बिजली बरखा थिएटरे होते आणि गोपी टॅंक मार्केट जेथे आजही आहे आणि जेथे आजही ताजे मासे मिळतात .हो ,तोच माटुंगा ,तर तुम्ही नाक्यावरच्या पेट्रोल पंप च्या दिशेने माहीम काढे वळा तेथे ३ ते ४ मिनिटीच्या अंतरावर तुम्हाला 'अमीन मंझिल ' ही दोन मजली इमारत दिसेल , सॉरी दिसली असती पण आता ती रिडेव्हलोपमेंट ला गेली आहे . तर 'अमीन मंझिल ' च्या तळ मजल्या वर  कोपऱ्यावर आनंद बुक डेपोत , उत्तरकार ब्रॉथेर्स अशी दुकाने आहेत, सॉरी होती ... आता तुमच्या नेमकं लक्षात आले असेल .


तर ह्या दोन दुकानांना धरून एकूण ४८ खोल्या असलेली व वर एक छान terrace असलेली दोन मजल्या ची जिन्याने दोन भाग केलेली परंतु एक संघी इमारत आता पर्यंत होती .दोन बाजूला प्रतेय्क मजल्यावर प्रतयेकी दोन दोन असे शौचालय , त्यांना लागून दोन मोर्या त्यात नळ व एक बाथरूम असलेली .
तळ मजल्यावर लागून एक एक चौक त्यामध्ये सार्वजनिक नळ . ही इमारत आता पर्यंत होती

इमारतीत मी व माझंही मित्र म्हणजे दीपक माहिमकर, रंजन ठाकूर , सुकुमार उर्फ बाबू , बचू  म्हणजे नीलरातं ताम्हाणे , चित्ता उर्फ चित्तरंजन ताम्हाणे , राजू उर्फ विनायक हाज़िरणीस  व अनिल सालये  व नरेंद्र पै असे आम्ही (तेवहाची ) मुले , एकमेकांना  मारत,खोड्या काढत राहात असत , कधी वेडावून दाखवत कधी कट्टी बत्ती करीत लहानाचे  मोठे झालो आणि  एकमेकांना  अभ्यासात मदत करू लागलो ते कळलेच नाही .अध्याप हि   आम्ही एकमेकांच्या   संपर्कात  आहोत


No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels