Friday, 2 June 2017

एक अकस्मात भेट Sylvester Stallone बरोबर !!!!!!

Sylvester Stallone


प्रिय वाचक .

नमस्कार



Sylvester Stallone


माटुंग्याला पूर्वी  एक 'श्री ' सिनेमा थिएटरे होते . त्यामध्ये  हॉलिवूड चे चित्रपट लागल्याचे म्हणजे कोलाबा , फोर्ट एरिया त  शिळे  झाले कि ते मग श्री सिनेमात लागायचे

Rambo


जुने असल्यामुळे म्हणा  , price  कमी असल्यामुळे  म्हणा , हॉलिवूड चे सिनेमा स्वस्त्यात पाहायला मिळतायत म्हणून माहीम दादरकर मंडळी खुशीत होल्ल्येऊंड चे सिनेमा पाहायाचे .

मला व माझ्या 'अमीन मंझिल ' इमारतीतील  मुलांना इंग्रजी 'गन fight ' दिश्याम दिश्याम 

असे गन मधून येणारे ते आवाज व तागडे घोडे त्यावर स्वार  ते 'cowboys ' , त्यांच्या ती डोक्यावरची hat  , कुठल्याहि  क्षणी गोळीबार करणारी ती हातात गरगर फिरणारी पिस्तूल शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करून कधी , मागे न बघता प्रतिस्पर्धकावर ते गोळ्या  झाडायचे .


इंग्रजी कळायचे  नाही पण भाषेची अडचण नवाहती . त्यातल्यातात ओळखीचे शब्द संवांदात आढळल्याचे  आणि पुर्ण वाक्याचे अर्थ कळायचा आणि मग आपल्याला कसा तेथ कळला ह्याचे मोठेपणा मारत घरची वाट काढायची ...


हॉलिवूड चे काही हिरो आमच्या अद्याप हि लक्षात राहिले 'अँथोनी Quinn '  स्टिव्ह MCQUEEN , ग्रेगरी पेक  ( ज्याची असिटिंग मारून मरून देव आनंद स्टार झाला ) शॉन काँनेरी , रॉजर Moore  म्हणजे  जेम्स बॉण्ड , परंतु रेम्बो , ROCKY  फॅमे सिल्वेस्टर STALLONE ची बात हि कूच और आहे . त्याची ती पिळदार बॉडी , सडसडीत बांधा , , त्याची भेदक नजर शत्रू ला टिपण्याची त्याची शैली , त्याचा अभिनय , , त्याचा रुबाब मला फार आवडायचा अगदी त्याचा चित्रपट पाहायला मिळाला नाही तरी त्याचे पोस्टर पाहून आनंद वाटायचं (आता YOUTUBE वर पाहायला मिळतात )


तर सांगायचं मुद्धा असा कि हॉलिवूड स्टार सिल्वेस्टर Stallone तुमच्या बाजूलाच येऊन उभा राहिला तर ?

आणि एवढे असून हि मला इंग्रजी बऱ्या पेकी येत असूनही मी त्याला असपशष्ट ओळखावे'
आणि सोबत असलेल्या माझ्या Convent मध्ये शिकलेल्या मुलीने तर त्याला अजिबात ओळखूनये ?


Sylvester Stallone



हे असे झाले के मी व माझी मुलगी दीप्ती मासे आणायला मॉल मध्ये गेलो होतो (बायको बाजारात मासे आनायायाला कंटाळा करत असल्या मुळे )  आम्ही कधी कधी मॉल मधून मासे आणतो .

अंधेरीच्या एका प्रसिद्ध मॉल  'स्टार मॉल ' मध्ये आम्ही मासे आण्याला गेलो होतो आता तुम्ही म्हणाल सिटीलाईट  चे  गोपी टॅंक मार्केट सोडून हा अंधेरी ला कुठे गेला , तर आता आम्ही अंधेरी ला राहतो


मासे पाहता पाहता 'सुरमई 'गळाला म्हणजे मनाला अडकली व घेऊन टाकली कारण माझं लक्ष्य  बाजूच्या ऐका भिंतीला लागून साक्षात सिल्वेस्टर STALLONE उभा होता .पण दुर्देवाने सुरमई कशी कापतोय त्याच्या तुकड्या कश्या करतोय ह्यात लक्ष्य असल्या मुळे  थोडा बेचैन झालो होतो ह्या अमेरिकन माणसाला कुठे तरी पहायला असावा असे  सारखे वाटत होते मी माझ्या मुली ला म्हणालो (दीप्ती)
ला के हा मला कोणी तरी हॉलिवूड चा मोठा ऍक्टर वाटतोय , तिचे सुद्धा लक्ष्य 'सुरमई ' मध्य असल्या मुळे  तिले सुद्धा काही आठवेना ....

Hollywood Actor



मग  मी तिला सांगितले कि हळूच माझंही व त्याचा फोट काढ  व तिने तसे केले  . मग घरी आलाय वर YOUTUBE वर पाहल्या वर खात्री झाली कि तो सिल्वेस्टर STALLONE च होता





आता काय मी मग  पश्चताप  , पखाले असते तर दोन शब्द बोलोअसतो .. तेवढचं मनाचे समाधान झाले असते ना ...  आणि मग आम्हाला समजले कि सिल्वेस्टर STALLONE त्या दरम्यान मुंबईत आला होता

..


Rocky


काय म्हणावे ह्याला हे असे झाले ....


बाकी सुरमई छान होती, कालवण एक्दम छान झाले, तुकड्या पण अगदी छान  फ्राय झाल्या होत्या ! जेवताना आठवण काढिली हं तुमची ...  
लोभ असावा


एक मराठी माणूस










No comments:

Post a Comment

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels