जॉन यांनी खाली नंबर 16 सोडल्या नन्तर, काही महिन्यांनी त्या खोलीत रामजी त्यांची पत्नी, एक 2 ,3 महिन्याचे बाळ हातात घेतलेले, आणि रामजी यांची साठीतील मातोश्री एवढी मंडळी रहायला अली . रामजी साधारणतः34 ,35 वर्ष वयाचे असतील, शिडशिडीत बांधा,कला सावळा रंग मिशी ठेवलेले ,आजू बाजूच्यांशी बोललेच तर थोडेसे लाजतच बोलणारे नाहीतर शक्यतो बोलणे टाळणारे पेशाने उत्कृष्ट मोटर मेकॅनिक ,उत्कृष्ट या साठी की गिऱ्हाईक सकाळी सकाळी दारांत त्यांना घ्यायला हजर रहात, दर दिवशी दुपारी घरच जेवायला येताना, रिपेर ला आलेली गाडी कुठल्याही मॉडेल ची चालवत आणणार, जाताना घेऊन जाणार असा दिन क्रम असायचा .पत्नी सीता, गृहिणी त्यामुळे जेवण खान, बाळाला समभाळणे,थोडंफार, सासूचे बोलणी ऐकणे, पण भांडण कटकटी नाहीत ,रामजी ह्यांची आई, माटुंगा पूर्वेला एक गुजराथी शेट कडे ज्यांच्या त्या अगोदर पासूनच काम करीत होत्या तिथे आता मुलगा चांगला कमावतो असतानाही काम करणे चालू ठेवून होत्या,कदाचित स्वतःची काही हात खर्चाला कमाई असावी, असा त्यांचा हेतू असावा, घरी आल्यानंतर त्या आमच्या आई, आजीशी इकडच्या तिकडच्या थोडावेळ गप्पा मारीत, सुनबाई सुरवातीला बोलत नसत त्या बोलायला कचरत असाव्यात, पण इमारतीत नळ, टॉयलेट, तसेच रेशन दुकान कॉमन असल्याने त्याही मग हळू हळू बोलायला लागल्यल
ा. एकंदरीत हे कुटुंब जरी खेडवळ, अशिक्षित असले,तरी समाधानी होते .
ा. एकंदरीत हे कुटुंब जरी खेडवळ, अशिक्षित असले,तरी समाधानी होते .
बरीच वर्षे गेली, रामजी मोटर मेकॅनिक, अचानक मोटार अकसिडेंट ने वारले त्यांचा मुलगा जयेश त्यांनी च नाव ठेवलेला दीड वर्षाचा असतानाच हा अपघात झाला,मग कोर्ट कचेऱ्या झाल्या, त्यात मोटर अकसिडेंट क्लेम द्वारे कुटुंबियांना त्यावेळच्या हिशोबाने लाख भर रक्कम मिळाली, त्या द्वारे जयेश च्या आजीने गावी थोडी शेती घेतली काही रक्कम पोष्टात नातवाच्या नावे मुदतीवर जमा ठेवली,आजी आपल्या जिकडे काम करीत होत्या, तिथे त्या पुन्हा जाऊ लागल्या, पुढे जमेना तसे, त्या गावी गेल्या, जयेश एस एस सी पास होऊन गॅस एजन्सी कडे क्लार्क म्हणून काम करू लागला, त्याने पुढे शिक्षण घेण्याचे नाकारले, कडचित त्याचा सगळी अवडच गेली असावी, शिक्षणात तसा तो ब्रा होता, इमारतीतील लोकांचे मुलांचे त्याच्यावर प्रेम होते, पण त्याने शिक्षण नाकारले, पुढे त्याचे लग्न झाले, त्याला मुलगी झाली , पण त्याची आई सीताबाई घरात आद्यप ही हातभार कामात लावत होत्या नातीलही त्या प्रेमानं सांभाळत, पण हळू हळू त्यांची तब्बेत ढासळत होती, महेश च्या मध्यंतरी वृद्धापकाळाने वारल्या होत्या त्यामुळे सिताबाईना, अधून मधून, गावी जायला लागत होतं.त्यामुळे ही असेल त्याही अचानक एक दिवशी वारल्या.त्यामुळे जयेश त्याची पत्नी आणि मुलगी तिथे राहू लागले त्या खोली नंबर 16 मध्ये .जयेश ची मुलगी तिथेच मोठी होत होती, जयेश ने एक चांगले केले मुलीला कॉन्व्हेंट शाळेत घातले मुलगीही हुशार अभ्यासू निघाली जयेश ची पत्नी संसाराला हातभार म्हणून आजूबाजूच्या इमारतीत चपात्या करून देऊ लागली .
आता ती इमारत, एका बिल्डर ने घेतली, आणि सर्व भाडोत्र्यांना 405 चोऊ.फूट, चा फ्लॅट, दिला त्यासाठी त्यांची इमारत, त्यांनी भुई सपाट केली त्यात सर्व खोल्यां बरोबर,खोली नंबर16 ही भुई सपाट झाली आणि तिथे उंच टॉवर उभा राहिला,त्यात टॉवर एक बाजूला 14 मजला पर्यंत,सर्व भाडोत्र्यांना 405 चोऊ . फुटाचा सेल्फ कॉन्टेन्ट फ्लॅट बिल्डर ने प्रामाणिक पणे दिला, त्या प्रमाणे जयेश ला ही14 व्या मजल्यावर दोन टॉयलेट फ्लॅट मिळाला .
भुई सपाट झालेल्या आधीच्या इमारतीचे एक वैशिष्ठ होत,तिने प्रत्येक भाडोत्रीला, जास्तीत सुख मिळेल ,हे केलं, अगदी स्वतः भूमिगत,होऊन चौपट क्षेत्राची रहायची जागा दिली,त्या इमारतीला त्या भूमीला,प्रणाम !.