Sunday, 30 August 2020

वाडगा लोभाचा

             एक अत्यांत श्रीमंत मनुष्य होता पण त्याला खूप हाव ,होती प्रत्येक वेळी त्यास काही प्राप्त झाले तरी आणखी काही, जास्त, मौलिक मिळाले हवे असायचे, तशी तो देव कडे मागणीही करायचा.
              एकदा असे, झाले की त्याच्या दारात एक भिक्षुक आला, आणि त्याने श्रीमंत माणसाकडे   भीक म्हणून काही चिल्लर मागितली श्रीमंत माणसाने ही सदऱ्याच्या खिशातून थोडी चल्लर काढून  भिक्षुकाच्या वाडग्यात थोडीशी चिल्लर टाकली.
               भिक्षुक खुश झाला मात्र त्याच्या वाडग्यातून चिल्लर गायब झाली,
भिक्षुकाने ओशाळला सारखा चेहेरा करून श्रीमंत गृहस्त कडे पाहत आणखी जास्त चिल्लर मागितली , श्रीमंत माणसाने त्याप्रमाणे चिल्लर टाकली मात्र ती ही गायब झाली, हे असेच चालत होते भक्षुक मागील होता श्रीमंत देत होता मात्र वाडगा रिकामाच व्हायचा
भिकाऱ्याने घर मागितले, मिळाले, बंगला ,  महाल गाडी जे काही मागितले श्रीमंत देत गेला पण वाडगा रिकामाच!
                 शेवटी, श्रीमंत चिडला, म्हणाला "हा वाडगा आहे की थट्टा "!, जे देतोय ते गायब होते"!.आता माझ्याकडे काहीच नाही मीच आता भिकारी झालोय!.
                   तेव्हा तो भिकारी हसला म्हणाला, काय करणार , हा वाडगा आतून खुप पोकळ आहे सगळे समावेल त्यात , त्याचा हव्यास संपणार नाही .आपण कोणाला जवळ करतोय  हे प्रथम जाणून घ्यायला हवे, आपण कोणाला मनाचा मोठेपणा  दाखवत आहोत याचे भान असू द्यावे, तुमच्याकडे धन येणार असेल त्याचा शोध ह्या वाडग्या सारख्या ना आधीच लागलेला असतो,आपल्या कडे कर्तृत्व असल्याने आपला हक्कच बनतो अधिक मिळण्याचा,आणि त्या प्रमाणे ते मिळते ही,मात्र अशे वाडगे, दूरच ठेवावे.असे म्हणून तो भक्षुक अदृष्य झाला, श्रीमंतांचे वैभव मात्र त्याच्या सोबतच राहिले.हात मात्र नम्रतेने जोडले गेले होते.!

Mazhya Kahi Recipes

Namaskar, Mee Prakash Harishchandra Gharat...punha aaplya bhetila. Aata kahi recipes paha...majhya bayko Ani Mee rac...

Labels